तीन वर्षांपासून वरूणराजा तालुक्यावर रूसला आहे. पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची समस्या बिकट झाली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला नसून रोहिणी संपून मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडेठाक गेले. सलग तिसरा पावसाळा वाया गेला तर शेती व्यवसाय कोलमडून पडणार आहे. हाती पीकपाणी नसल्याने आधीच कर्जबाजारीपणाने त्रस्त झालेला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असल्याचे प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी सांगितले. यावेळी कामगार सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, अपंग सेलचे तालुकाध्यक्ष अरूण पाचोरे, उपाध्यक्ष कमलाकर शेलार, अर्जुन घोरपडे, गणेश ठाकूर, भगवान पाचोरे, गणपत नाठे, नंदू शिरसाठ, आनंद सातभाई, गणेश जाधव, बाळू सहाणे, पुंजा हारक आदी उपस्थित होते.
सिन्नरला जोरदार पावसासाठी महादेवाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 5:26 PM