सिन्नर : येथील महाविद्यालयाने विभागीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवून राज्य पातळीवर प्रवेश मिळविला आहे.जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुस्ती स्पर्धेत सिन्नर महाविद्यालयाच्या सीमा लहाने व पल्लवी तपासे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळविले. पुणे जिल्ह्यातील खेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. या दोन्ही कुस्तीपटूंचा प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मविप्र समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, डॉ. तुषार शेवाळे, माणिकराव बोरस्ते, राघो अहिरे, डॉ. सुनील ढिकले, सिन्नर तालुका संचालक हेमंत वाजे यांनी कौतुक केले. विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक एल. एस. कांदळकर, पी, एम खैरनार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपप्राचार्य डॉ. डी. एस. जाधव, प्रा. आर. व्ही. पवार, प्रा. आर. टी. गुरुळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
सिन्नर महाविद्यालयाचे खेळाडू राज्य पातळीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:31 PM