सिन्नर: सरदवाडी रस्त्यावर सकाळी सात वाजेच्या सुमारास सरदवादी रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी फिरणाºया सात जणांविरोधात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी चे आदेश लागू केले आहेत. कोरोना विषाणू संसर्ग किंवा साथ रोग सुरू असल्याने लॉक डाऊन करण्यात आले आहे. असे असतानाही तोंडाला मास्क न लावता किंवा रुमाल का बांधतात मॉर्निंग वॉक साठी फिरणाºया सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी, हवालदार किरण पवार यांच्यासह शासकीय वाहनाने गस्त घालीत असताना सकाळी सात वाजेच्या सुमारास सदर व्यक्ती मॉर्निंग वॉक साठी सरदवाडी, झापवाडी शिवारात फिरताना आढळून आल्या. यासारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता असतानाही हलगर्जीपणा चे कृत्य करून लोकसेवकाच्या आदेशाची अवहेलना करताना मिळून आल्याने सदर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या सात जणांविरोधात सिन्नरला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 11:01 PM
सिन्नर: सरदवाडी रस्त्यावर सकाळी सात वाजेच्या सुमारास सरदवादी रस्त्यावर मॉर्निंग वॉक साठी फिरणाºया सात जणांविरोधात संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देसंचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नरला गुन्हा दाखल