सिन्नर : शहराच्या विविध रस्त्यांलगत ओएफसी केबल टाकण्यासाठी नगरपालिकेला नुकसानभरपाई म्हणून ५२ लाख ९ हजार ३८७ रुपये मिळाल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद चोथवे, नगरसेवक शैलेश नाईक यांनी दिली. शहरातील विविध मोबाइल टॉवर्स जोडण्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीने रस्ते खोदले. याकामी त्यांनी नगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते; मात्र चार महिन्यांपूर्वी आडव्या फाट्यापासून खासदार पुलाकडे जाणाºया रस्त्याच्या कडेला जिओने परवानगी न घेताच ओएफसी केबल टाकण्यास प्रारंभ केला होता. नाईक यांच्यासह चोथवे व गटनेते हेमंत वाजे यांनी केबल टाकण्यास विरोध केल्यानंतर नगराध्यक्ष किरण डगळे यांनी कंपनीला नोटीस बजावली. नगरपालिकेची परवानगी न घेता ओएफसी केबल टाकणे व रस्त्याचे नुकसान केल्यामुळे भरपाईपोटी २६ लाख रुपये नगरपालिकेला द्यावे, असे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा बसस्थानक, नाईक फरसाण, भैरवनाथ मंदिर, कामगार चौक, नाशिक वेस, शिवाजीनगर, गणपती मंदिर, वरंदळ मळा, ढोकेनगर भागातील रस्त्यांलगत ओएफसी केबल टाकण्यासाठी कंपनीने नगरपालिकेकडे परवानगी मागितली. त्यावर ५२ लाख ९ हजार ३८७ रुपये नुकसान भरपाई म्हणून द्यावे, असे नगरपालिकेने कंपनीला कळविले होते.
रस्त्यांच्या नुकसानभरपाईपोटी निधी सिन्नर : नगर परिषदेला मिळाले ५२ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:37 PM
सिन्नर : रस्त्यांलगत ओएफसी केबल टाकण्यासाठी नगरपालिकेला नुकसानभरपाई म्हणून ५२ लाख रुपये मिळाल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद चोथवे, शैलेश नाईक यांनी दिली.
ठळक मुद्देकेबल टाकण्यास विरोधजिओ कंपनीने रस्ते खोदले