सिन्नर: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता सर्वत्र अंतर राखून व्यवहार करण्याच्या सूचना आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नगरपरिषद व सामाजिक जबाबदारीने प्रेरित तुफान आलंया मित्र मंडळाच्या वतीने ग्राहक व विक्र ेते यांना ‘सोशल डिस्टिन्संग’ पाळण्यासाठी उपाय करण्यात आले आहेत.तहसिल व पालिकेने सर्व भाजी मंडईमध्ये दुकानदार आण िग्राहक यांच्यात सीमारेषा आखली आहे, त्यामुळे नगरपालिकेच्या सहकार्याने तुफान आलंया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरु वारी (दि.26) शहरातील किराणा दुकान, मेडीकल आदींसमोर रेखांकन केले. त्यामुळे आता अनेक किराणा दुकानदार आण िऔषध विक्र ेत्यांसह नागरिकांनीदेखील सोशल डिस्टिन्संगवर भर दिला आहे. त्यामुळेच आता ग्राहकांना किमान दीड ते दोन फूट अंतरावरूनच व्यवहार करावे लागत आहेत. वंजारी समाज मैदानावरील भाजीबाजार बर्?यापैकी सुटसुटीत झाला आहे.नागरिकांनी कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी बाधीत व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये, यासाठी शासन आण िप्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. हस्तांदोलन टाळण्यापासूनच दोन ते तीन फूट अंतरावर राहूनच बोलणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. पालिकेने संचारबंदी काळात शहरातील वंजारी मैदान, संजीवनी शाळेजवळी मोकळा भूखंड व बाजार समतिीचा कृषीममॉल या तीन ठिकाणी भाजीबाजाराच्या जागा निश्चित केल्या असून, त्याठिकाणी येणार्?या नागरिक आण िविक्र ेते यांच्यात अंतर रहावे, यासाठी रेषांची आखणीचे काम तुफान आलंया या सामाजिक संस्थ्लृेने केले. बाजार समतिीच्या कृषी मॉलमध्ये आमदार माणकिराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाल शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने भाजीबाजार सुरु करण्यात आला. तेथ्लृेदेखील कार्यकर्त्यांनी ग्राहक व विक्र ेत्यांसाठी मार्कींग केले. भाजीपाला घेण्यासाठी येणारे ग्राहक त्या रेषेच्या अलीकडूनच व्यवहार करीत आहेत. याशिवाय विक्र ेतेदेखील मास्क लावत आहेत. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिकांनी याबाबत दक्षता घेण्यास सुरु वात केली आहे.
सिन्नरला भाजीबाजारात ‘सोशल डिस्टन्सिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:51 PM