सकाळी ८ वाजता पहिली जमाअत मर्कज अहेले सुन्नत बाराभाई मस्जिदमध्ये झाली. मौलाना सिद्दीक यांनी नमाज खुतबा व दुआ केली. तसेच शक्कर मस्जिदमध्ये साडेआठ वाजता जमाअत झाली. तेथे हाफिज सिद्दीकी यांनी नमाज खुतबा व दुआ केली. मक्का मस्जिद येथे साडेनऊ वाजता जमाअत करण्यात आली. तेथे मौलाना अकिल यांनी नमाज खुतबा व दुआ केली. जामा मस्जिदमध्ये ९ वाजता मौलाना सिद्दीक आलम यांनी नमाज खुतबा व दुआ केली. मदिना मस्जिदमध्ये मौलाना तन्वीर रजा यांनी नमाज खुतबा व दुआ केली. शहरातील पाचही मस्जिदमध्ये पावसासाठी विशेष दुआ करण्यात आली. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, नगरसेवक नामदेव लोंढे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, प्रभाकर गोळेसर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदींनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचे मुस्लीम समाजाच्या वतीने मुजाहिद खतीब यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले. यावेळी मुजाहिद खतीब, मुजाहिद पटेल, जमीर काझी, अय्युब शेख, अश्पाक सय्यद, जावेद इब्राहिम, रईस काझी, सलीम काझी, हाजी रियाज कोरबे, हाजी इरफान खतीब, तन्वीर शेख, साजीद खतीब, साबीर यासीन, इरफान पठान, शौकत अमीन, शफीक शेख, शब्बीर हकिम, अजीज मोमीन, जहुर शेख, अमीन पठान, मजीद मोमीन, समीर खतीब, नसीर मनियार, शब्बीर हमीदुल्ला, शब्बीर गुलाब, इक्बाल सैय्यद, अस्लम पिंजारी, वसीम मनियार, अॅड. शब्बीर शेख, मुदीर शेख, सिकंदर हकिम, बबलू मोमीन यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिन्नरला बकरी ईद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 9:43 PM