१० मे ते २३ मेपर्यंत कडक लॉकडाऊनमुळे बाजार समितीत लिलाव बंद ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधनात्मक नियमांचे पालन करून बाजार समितीत लिलाव सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यापार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळपासून बाजार समितीत प्रवेश करणाऱ्या शेतकऱ्यांची कोरोना ॲंटिजन टेस्ट केली जात होती. व्यापारी व कर्मचाऱ्यांनी अगोदरच टेस्ट केली होती. ज्या वाहनांना टोकन दिले आहे अशा वाहनांवरील शेतकऱ्यांची कोरोना टेस्ट करून आत प्रवेश दिला जात होता. मंगळवारी ५२ वाहनांतून ११०० क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल भाव १३७०, तर सरासरी भाव १३०० रुपये राहिला.
इन्फो
बाधिताला पाठवले रुग्णालयात
बाजार समितीचे सभापती लक्ष्मण शेळके, संचालक सुनील चकोर, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, बाळासाहेब चकोर, सुनील पन्हाळे, मंगेश कर्पे, दिलीप खिंवसरा, बाबुलाल लढ्ढा, बाजार समितीचे सचिव विजय विखे यांच्या उपस्थितीत सकाळी ॲंटिजन टेस्ट करण्यास प्रारंभ केला. यावेळी एक इसम पॉझिटिव्ह आल्याने त्यास उपचारासाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.