महिला आरक्षण सोडत जाहीर करताना गेल्या पंचवार्षिकचे सरपंचपदाचे आरक्षण विचारात घेण्यात आले. ज्याठिकाणी महिला सरपंच होत्या त्याठिकाणी ‘आळीपाळी’ने या तत्त्वाचा वापर करण्यात आला. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी ७, इतर मागास प्रवर्गासाठी १५, तर सर्वसाधारण जागेसाठी ३२ महिलांची आरक्षण सोडत काढण्यात आली.
अनुसूचित जातीसाठी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ७ ग्रामपंचायतींपैकी २ ठिकाणी महिला सरपंच होत्या. त्याठिकाणी ‘व्यक्ती’साठी आरक्षण जाहीर करण्यात आले. उर्वरित ५ पैकी चार चिठ्ठ्या काढून महिला आरक्षण जाहीर करण्यात आले. ऋषिकेश जाधव या पाच वर्षीय मुलाच्या हाताने चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
अनुसूचित जमातीसाठी १४ पैकी ७ महिला राखीव करावयाच्या होत्या. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत या १४ ग्रामपंचायतींपैकी ५ ठिकाणी महिला सरपंच होत्या. म्हणून ९ पैकी ७ चिठ्ठ्या काढून या जागेवर महिला सरपंचपद राखीव करण्यात आले. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या ३० जागांवर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत १५ जागा महिलांसाठी राखीव होत्या. त्या जागा व्यक्तीसाठी गेल्या, तर उर्वरित १५ जागांवर गेल्या वेळी महिला सरपंच नव्हत्या. त्या १५ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आल्या. याठिकाणी चिठ्ठी काढण्याची गरज पडली नाही.
सर्वसाधारण जागेच्या ६३ सरपंचपदाच्या जागांपैकी ३२ ठिकाणी महिला सरपंचपद राखीव करावयाचे होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्या २९ ठिकाणी महिला सरपंच होत्या. त्या जागा सर्वसाधारण झाल्या, तर ३ जागांसाठी चिठ्ठी काढण्यात आली. गेल्यावेळी ३४ ठिकाणी महिला सरपंच होत्या. त्यातून ३ चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यात आगासखिंड, श्रीरामपूर (शिंदेवाडी) व जायगाव या तीन गावांसाठी महिलांची चिठ्ठी निघाली. अशा पद्धतीने ६३ पैकी ३२ सर्वसाधारण जागांवर महिला सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आले.
चौकट-
आरक्षण नसलेल्या गावांचा प्रस्ताव पाठविणार
तालुक्यातील काही गावांमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे महिला सरपंचपद आरक्षण जाहीर झाले. मात्र, खोपडी बुद्रुक व गुळवंच, अशा काही अपवादात्मक गावांमध्ये सदर प्रवर्गाची महिला निवडून आलेली नाही. त्यामुळे सदर ग्रामपंचायतींचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांनी दिली.
इन्फो
असे आहे ‘महिला सरपंच’ आरक्षण
अनुसूचित जाती महिला (४)- खोपडी बुद्रुुक/खुर्द, गुळवंच, पांगरी बुद्रुक, निमगाव-देवपूर.
अनुसूचित जमाती महिला (७) - पाटपिंप्री, के.पा. नगर, धोंडबार, चिंचोली, हिवरगाव, कोनांबे आणि मुसळगाव/गुरेवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (१५)- बारागाव पिंप्री, वडगाव- सिन्नर, मेंढी, पंचाळे, विंचूरदळवी, पास्ते, पाटोळे, पाथरे बुद्रुक, वारेगाव, मऱ्हळ बुद्रुक, कहांडळवाडी, मानोरी, नांदूरशिंगोटे, फर्दापूर, कासारवाडी.
सर्वसाधारण महिला (३२)- जोगलटेंभी, नायगाव, सोनगिरी, कोमलवाडी, सुळेवाडी, माळेगाव/मापारवाडी, शास्त्रीनगर, चोंढी, खडांगळी, कीर्तांगळी, कारवाडी, देवपूर, वडगावपिंगळा, जामगाव, सरदवाडी, घोरवड, मनेगाव, शिवाजीनगर, दत्तनगर, आडवाडी, चापडगाव, टेंभूरवाडी (आशापूर), सोनेवाडी, चास, मिठसागरे, मीरगाव, सुरेगाव, कणकोरी, निऱ्हाळे-फत्तेपूर, आगासखिंड, श्रीरामपूर (शिंदेवाडी) आणि जायगाव.
फोटो - ०५ सिन्नर सरपंच-१
सिन्नर येथे महिला सरपंच आरक्षण सोडत काढताना प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी पूजा गायकवाड. समवेत तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव व लहान मुलगा ऋषिकेश जाधव.
===Photopath===
050221\05nsk_44_05022021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ सिन्नर सरपंच-१ सिन्नर येथे महिला सरपंच आरक्षण सोडत काढतांना प्रशिक्षणार्थी प्रांताधिकारी पूजा गायकवाड. समवेत तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव व लहान मुलगा ऋषीकेश जाधव.