सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस टोचण्यात येत आहे.रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू करण्यात आली. दररोज शंभर कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी ६६ कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात आली. कोविड ॲपवर लसीकरणाची माहिती लगेच भरली जात आहे. डॉ. निर्मला पवार यांना प्रथम लस टोचण्यात आली. कार्यक्रमास नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, नगराध्यक्ष किरण बगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मुरकुटे, सभापती शोभा बर्के, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे, निलेश केदार, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, रोहिणी कांगणे, संजय सानप, नगरसेवक शीतल कानडी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ संजय वलवे, निर्मला पवार, नगरपरिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरनार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन बच्छाव, डॉ लहू पाटील, डॉ म्हस्के, डॉ. गरुड आदी उपस्थित होते.
सिन्नरला कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 9:25 PM
सिन्नर : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस टोचण्यात येत आहे.
ठळक मुद्देदररोज शंभर कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार