सिन्नर : करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती व गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन शिवभोजन थाळी हा उपक्र म तालुका पातळीवरही राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, शहरातील तीन ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे.दरम्यान, शहरातील तीनही शिवभोजन थाळी केंद्रांवर अनुक्र मे८०, ९०, ८० याप्रमाणे २५० शिवभोजन थाळी गोरगरिबांसाठी उपलब्ध करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दहा रु पयांऐवजी ५ रु पयांत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेत या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार केला. दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख थाळीचे वितरण करण्यात येणार आहे. शहरातील शिवाजी चौकात केंद्र क्र .१- भरारी महिला बचतगट (८० थाळी), हिंदू खाटीक समाज ट्रस्ट हॉल, पंचायत समितीजवळ, खडकपुरा येथे केंद्र क्र .२- जिजाऊ स्वयंसहायता महिला बचतगट, सिन्नर(९० थाळी) व साईमल्हार खाणावळ, अपना गॅरेजजवळ, केंद्र क्र . ३- अटलज्योती नवनिर्माण संस्था सिन्नर (८०० थाळी) या तीन ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, शिवभोजन योजना समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून तहसीलदार राहुल कोताडे राहणार असून, त्यात गटविकास अधिकारी सदस्य व मुख्य अधिकारी सदस्य सचिव अशी त्रिस्तरीय समिती या योजनेवर नियंत्रण राखेल.
सिन्नरला तीन शिवभोजन थाळी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:12 PM