सिन्नर : समाजात सर्वार्थाने वंचित घटक असलेल्या दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या दिव्यांग कलामहोत्सव भरविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी व्यक्त केले.येथील सार्वजनिक वाचनालयात लोककलाकार अंबादास भालेराव यांच्या सहकार्याने आयोजीत दिव्यांग लोककला महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.माजी नगराध्यक्ष अश्विनी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर जिल्हा युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष दिनेश चोथवे, वाचनालयाचे संचालक नरेंद्र वैद्य, मनीष गुजराथी, नगरसेवक रूपेश मुठे, मंगला शिंदे, ज्योती वामने, सुजाता तेलंग, गणपत नाठे, राजेश कपूर आदी मान्यवर उपस्थित होते. अश्विनी देशमुख, मंगला शिंदे, नरेंद्र वैद्य, गणपत नाठे, केशव बिडवे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. दिव्यांग महोत्सवात शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या कथा, कविता, गायन आदी कार्यक्रम सादर झाले. या महोत्सवात सहभागी झालेल्या दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. अंबादास भालेराव यांनी प्रास्तविक केले. यावेळी पी. एल. देशपांडे, प्रकाश घुगे, आनंदा सातभाई, चंद्रकांत पवार, नंदू शिरसाठ, राजेंद्र खर्डे, दत्ता गरगटे, छबूबाई जाधव, भगवान पगर, मयूरी खर्डे, सूरज गोसावी, संजय नवसे आदी उपस्थित होते. नरेंद्र वैद्य यांनी आभार
सिन्नर येथे दिव्यांग कलामहोत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 5:52 PM