शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

सिन्नर नगरपालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश

By admin | Published: January 14, 2016 10:42 PM

शुभ वर्तमान : अनुदानासह वाढणार नगरसेवक, अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या

सिन्नर : राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने सिन्नर नगरपालिकेचा ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात समावेश केला आहे. सदर अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने अनुदानवाढीसह नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी संख्या वाढणार असल्याने सिन्नरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.औद्योगिकीकरणामुळे लोकसंख्या वाढण्यासह शहराचा चोहोंबाजूने विस्तार होत आहे. त्यामानाने मूलभूत सोयी-सुविधा पुरविताना निधीअभावी व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे पालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत होती. क वर्ग नगरपालिकेला त्यामुळे अनेक मर्यादा होत्या. शासनाकडून मिळणारा निधी कमी पडत होता. हद्दवाढ झाल्याने अनेक उपनगरे शहरात समाविष्ट झाली होती. त्यामुळे सर्वांना मूलभूत सुविधा पुरविताना पालिकेची दमछाक होत होती. सन २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६५ हजार २९९ एवढी झाली आहे. त्यामुळे नगरविकास खात्याने सिन्नर पालिकेला ब वर्ग दर्जा प्रदान केला आहे. या निर्णयामुळे शहर विकासासाठी पूर्वीपेक्षा जास्त निधी मिळणार आहे. क वर्गाच्या पालिकेमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित होती. हंगामी कंत्राटदार भरून शहरातील कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून आटापिटा केला जात होता. ब वर्ग दर्जा मिळाल्याने पालिकेला २७ संवर्गातील अधिकारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे पालिकेच्या अभियंत्यांची संख्या ११ होणार आहे. पालिकेचा बवर्गात समावेश झाल्याने मिळणारा निधी वाढणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने शहर विकासाच्या कामांना वेग येणार आहे. शासनाच्या मोठ्या योजना मिळण्यासही आता पालिका पात्र ठरणार आहे. अनेक शासकीय योजना मिळविण्यासाठी यापूर्वीही पालिकेला १० टक्के स्वत:चा खर्च करावा लागत होता. आता मात्र १५ ते २० टक्क्यांपर्यंत पालिकेला विकास योजना राबविण्यासाठी स्वनिधी खर्च करावा लागणार आहे. (वार्ताहर)