इन्फो
सिन्नर ते नायगाव या तेरा किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या दोन्ही साइडपट्ट्या खोलवर गेल्या आहेत. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर दोन वाहने एकाच वेळी पास होताना तसेच मोठ्या वाहनांना साइड देताना खोल गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे अपघात होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या आठवडाभरात विविध वाहनांचे तब्बल डझनभर अपघात घडल्यामुळे ग्रामस्थ व प्रवाशांमध्ये भीतीबरोबरच संताप व्यक्त होत आहे.
कोट...
अरुंद तसेच खोल गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे हा रस्ता सध्या अपघातप्रवण बनला आहे. अशा धोकेदायक रस्त्याने विशेषतः रात्रीच्या वेळेस प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व साइडपट्ट्या बुजवणे गरजेचे आहे.
- श्याम कातकाडे, सामाजिक कार्यकर्ते, नायगाव
कोट...
दोन तालुक्यांना जोडल्या जाणाऱ्या या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र अरुंद व खोलवर गेलेल्या साइडपट्ट्यांमुळे धोकेदायक बनल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. अशा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी. केवळ पाच ते सात ठिकाणी मुरूम टाकून विभागाने परिसरातील ग्रामस्थ व वाहनचालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्याने संताप व्यक्त होत आहे.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना
फोटो -११ सिन्नर रोड
सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सिन्नर-नायगाव - सायखेडा या रस्त्याची झालेली दुरवस्था.
110921\11nsk_22_11092021_13.jpg
फोटो -११ सिन्नर रोड