सिन्नर : शहर व तालुक्यात घटस्थापना करून नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. ठिकठिकाणी भगवतीची स्थापना करण्यात आली. विविध मंडळांनी व मंदिरावरील रोशणाईने परिसर उजळून निघत आहेत.शहरात विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक, मनोरंजनाचे तसेच स्पर्धा, दांडिया, रास-गरबा आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहर व उपनगरांमध्ये रोशणाई करून देवीची विधिवत पूजन करून स्थापना करण्यात आली आहे. आडवा फाटा, संजीवनीनगर, लोंढे गल्ली, शिवाजीनगर, विजयनगर आदी भागात ठिकठिकाणी नवरात्रोत्सवाची धूम सुरू झाली आहे. काही मंडळांनी आजपासून दांडियाचे आयोजन केले आहे. आडवा फाटा येथील देवी मंडळाच्या वतीने केलेली आकर्षक रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.गावाबाहेरील सप्तशृंगदेवी मंदिरात घटस्थापनेपासून दसºयापर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसरात यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. येथील भगवती देवी आरती मंडळाच्या वतीने दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष पुरविण्यात येत आहे. गावाबाहेरील देवी मंदिरात पहाटे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सिन्नर येथील लोंढे गल्लीतील भद्रकाली मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कुंदेवाडी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव देवी मंडळाच्या वतीने तरुणांनी पायी जाऊन वणी येथील सप्तशृंगदेवी मंदिरातून ज्योत आणली. ज्योत पेटवून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. जगदंबा माता मंदिरात औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली. सटाणा शहरासह तालुक्यात आज ढोलताशाच्या गजरात अतिशय भक्तिमय वातावरणात घराघरात तसेच ठिकठिकाणी नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची स्थापना केली. यंदा ठिकठिकाणी तब्बल छत्तीस नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची अपूर्व उत्साहात स्थापना केली. शहरातील बाजारपेठेत आज सकाळपासूनच घटस्थापनेचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती तर विविध नवरात्रोत्सव मंडळांनी ढोलताशाच्या गजरात शहरातून मिरवणूक काढून देवीची स्थापना केली. मंडळांनी चौकाचौकात रोशणाई केली आहे तर काही मंडळांनी नऊ दिवस महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वराज्य नवरात्रोत्सव मंडळाने पाठक मैदानावर तरुणींसाठी नृत्य स्पर्धांचे आयोजन केल्याचे नगरसेवक राहुल पाटील यांनी सांगितले. शहरात आज अभिमन्यू नगरमधील अभिमन्यू नवरात्रोत्सव मंडळ, भाक्षी रोडवरील राजे शिवछत्रपती, सुकड नाल्यावरील कानिफनाथ, रामनगरमधील सप्तशृंगी देवी, अहिल्यादेवी चौकातील दामूनाना नंदाळे या नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची स्थापना केली तर ग्रामीण भागातील लखमापूर येथे बालाजी, उन्नती, ब्राह्मणगाव येथे अण्णा भाऊ साठे, अजमीर सौंदाणे येथे राजमाता अहिल्यादेवी, जय माताजी, चौगाव बर्डा येथे एकलव्य, आराई येथे स्वराज्य, मावळा, नवदुर्गा, मोरेनगर येथे श्री छत्रपती, वीरगाव येथे सप्तशृंगी, भगवती ग्रुप, अंबिका, केरसाने येथे वीर एकलव्य, बुंधाटे येथे महाड दंड नाईक, एकता, औंदाणे येथे राजे शिवछत्रपती, चौंधाणे येथे सप्तशृंगमाता, सावरगाव येथे अंबिका ग्रुप, दºहाने येथे संघर्ष फ्रेंड सर्कल, यशवंतनगर येथे यशवंत अशा एकूण सत्तावीस नवरात्रोत्सव मंडळांनी स्थापना केली.
सिन्नर, पेठ, लोहोणेरला आदिमायेचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:56 PM