सिन्नर : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा सोडून देण्यात आले. गगनाला भिडलेले पेट्रोल, डिझेल व अन्य इंधनाचे दर कमी करण्यासाठी भाजपा-शिवसेना युती सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी यावेळी बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, त्याप्रसंगी अॅड. रवींद्र पगार बोलत होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी टीव्हीवर येऊन ‘बहुत हो गयी महंगाई की मार’ असं म्हणणाऱ्या त्या काकू आता पेट्रोलचे दर ८१ रुपयांच्या पुढे गेले तरी अद्याप का दिसत नाहीत, असा सवालदेखील पगार यांनी यावेळी बोलताना केला. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे यासोबतच केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनप्रसंगी प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे, डॉ. भारती पवार, विष्णुपंत म्हैसधुणे, जिल्हा परिषदेचे सभापती यतिन पगार, सदस्य डॉ. सयाजी गायकवाड, नितीन पवार, यशवंत शिरसाठ, व्ही.एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष रवींद्र काकड, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोेत्तम कडलग, निवृत्ती अरिंगळे, जयराम शिंदे, योगेश निसाळ, बाळासाहेब म्हस्के, दत्तात्रय माळोदे, विलास सानप आदींची भाषणे झाली. पेट्रोल, डिझेलची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडण्याची भीती यावेळी वक्त्यांनी बोलताना व्यक्त केली. भाजपा-शिवसेना युती सरकारला सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणे-घेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून पगार यांच्यासह पदाधिकाºयांना पोलीस बळाचा वापर करून महामार्गावरून उचलून लांब सोडण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते डी. डी. गोर्डे, डॉ. विष्णू अत्रे, नामदेव कोतवाल, अर्जुन बर्डे, सायरा शेख, मेघा दराडे, निर्मला रेवगडे, संध्या भगत, अफरीन सय्यद, मीरा वाघमारे, युनुस शेख, राजेंद्र भगत, दौलत त्रिभुवन, संदीप लोखंडे, राजेंद्र माळी, सुदाम शिरसाठ, रतन तुपे, वामन पवार, रमेश देशमुख, भगीरथ रेवगडे, जयप्रकाश गायकवाड, राजेंद्र सोनवणे, शुभम भारसाकळ, राजाभाऊ उगले, वाळीबा उगले, प्रफुल्ल पाटील, कपिल भावले, समर सोनार, संदीप आवारे, मधुकर कणसे, राहुल मोकळे, राजेंद्र उगले, प्रवीण चव्हाण, स्वप्निल कुटे, रवींद्र धुर्जड, गोकुळ कांडेकर, रोहित कटाळे, महिंद्र कासार, सचिन टिळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
सिन्नर : पेट्रोल, डिझेल दरवाढीचा निषेध; शासनाविरोधात घोषणाबाजी राष्टÑवादी काँग्रेसचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:45 AM
सिन्नर : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देआंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झालीपेट्रोल, डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजे