सिन्नर : शहरासह तालुक्यात आणि शेजारील अहमदनगर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या कागदपत्रे नंतर देतो असे सांगून विकणाऱ्या संशयित चोरट्यास सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितास सिन्नर न्यायलयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सिन्नर शहर आणि तालुक्यात दुचाकी चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर, निफाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्याकडून दुचाकी चोरांचा छडा लावण्याच्या सूचना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सिन्नर पोलिसांना करण्यात आल्या होत्या.
पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांचे पथक तयार करण्यात आले होते. विविध गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी या पथकाकडून शोध सुरू होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्यातील पथकातील कर्मचारी गणेश परदेशी, विनोद टिळे, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड सिन्नर शहरातील सरदवाडी रोड येथे बायपास पुलाच्या जवळ अचानक नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी सरदवाडीकडून सिन्नरकडे पॅशन दुचाकीने ( एम. एच. १५, डीए ७९७८) जाणाऱ्या युवकास थांबवून त्याच्या वाहनाच्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास सिन्नर पोलीस ठाण्यात आणून त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्यात ती दुचाकी ऑक्टोबर २०२० मध्ये सरदवाडीरोड भागातील हॉटेल मिलनबारच्या पाठीमागून चोरी केल्याची कबुली दिली.
या गुन्हयात संशयित दिनेश विजय बागुल (१९, रा. मापारवाडी, सिन्नर) यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून आणखी चौकशी केल्यानंतर चोरीच्या सात दुचाकी काढून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयितास सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चौकट-
कागदपत्रे नंतर देतो सांगून विकत होता दुचाकी
संशयित आरोपी हा दुचाकी चोरल्यानंतर कागदपत्रे नंतर देतो असे सांगून दुचाकी विकत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. विकलेल्या दुचाकी संशयिताने सिन्नर शहर, माळेगाव एमआयडीसी, पंचवटी, निमोण ता. संगमनेर, शिर्डी आदी परिसरातून चोरी केल्याबाबत कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फोटो - २९ सिन्नर बाइक
सिन्नर पोलिसांनी दुचाकी चोरट्यास सात दुचाकींसह अटक केली. त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड आदी उपस्थित होते.
===Photopath===
290621\29nsk_27_29062021_13.jpg
===Caption===
सिन्नर पोलिसांनी दुचाकी चोरट्यास सात दुचाकीसह अटक केली. त्याप्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड आदि.