निऱ्हाळे : सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतिक टपाल दिन ते राष्ट्रीय टपाल दिन या टपाल आठवड्याची सांगता नुकतिच संपन्न झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालूका पोस्टमास्तर आर व्हि परदेशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष जगन्नाथ पवार व जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मु.श.गोळेसर उपस्थित होते.शालेय जिवना पासून च पोस्ट व पोस्टल कर्मचारी वर्गाचा नेहमी चा संबंध आलेला असुन मामाचे पत्रा पासून ते आज हि वयाच्या सतराव्या वर्षी ही पोस्टाचे पोस्ट कार्ड चा वापर करत असल्याचे पवार यांनी सांगितले.मु.श.गोळेसर म्हणाले की ईतर बँका आणि संस्था पेक्षा पोस्टाचा कारभार विश्र्वासणीय असल्याचे सांगितले.राष्ट्रीय टपाल आठवड्यात सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतीक टपाल दिनापासून ग्राहाकांनी टपाल जीवन विमा योजना, अटल पेन्शन योजना बॅकींग सेवा,टपाल तिकीट संग्रह, टपाल व्यवसाय, टपाल सेवा, ईतर बँका चे पैसे पोस्टात आधार लिंक करून काढून देने, विद्यार्थी वर्गाचे शिष्यवृत्ती खाते, गरोदर माता चे अनूदान खाते, सुकन्या योजना, मासिक ठेव.फिस्कठेव योजना आदी सेवा देण्यात आल्या असल्याची माहिती तालूका पोस्टमास्तर आर व्हि परदेशी यांनी दिली.यावेळी पोस्टमास्तर परदेशी यांनी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मु.श.गोळेसर व माजी नगराध्यक्ष जगन्नाथ पवार , बबन डोईफोडे, यांना पोस्टाचे पोस्ट कार्ड देऊन गौरविण्यात आले.
सिन्नर पोस्ट कार्यालयात, राष्ट्रीय टपाल आठवड्याची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 9:04 PM
निऱ्हाळे : सिन्नर पोस्ट कार्यालयात जागतिक टपाल दिन ते राष्ट्रीय टपाल दिन या टपाल आठवड्याची सांगता नुकतिच संपन्न झाली.
ठळक मुद्देजागतिक टपाल दिन ते राष्ट्रीय टपाल दिन