सिन्नर तालुक्यात कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देऊ नका, अशा सूचना कोकाटे यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी आम्ही २४ तास काम करून जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्मिती करू, असे आश्वासन या उद्योजकांनी दिले. सध्या दोन्ही प्लांट मिळून दररोज २५०० ते २९०० ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होत आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयासह ज्या ठिकाणी कोविड रुग्ण जास्त आहे, त्या ठिकाणी छोटे सिलिंडर जास्त वापरण्यापेक्षा सुमारे २५ सिलिंडर इतका ऑक्सिजन एकाच वेळी साठवून ठेवता येतील अशा प्रकारचे ड्युरा सील टॅंक संबंधित हॉस्पिटलांना तत्काळ पुरवावे, अशा सूचनाही आमदार कोकाटे यांनी यावेळी दिल्या. एसएमबीटी रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी ४५ बेड वाढविले आहेत. टाकेद येथेही नव्याने ५० बेडची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहितीही कोकाटे यांनी दिली.
इन्फो
ब्राह्मणवाडेच्या प्लांटसाठी प्रयत्न
ब्राह्मणवाडेजवळ हवेवर प्रक्रिया करून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट आहे. मात्र हा प्लांट सध्या बंद आहे. कोकाटे यांनी संबंधित प्लांटच्या मालकाशी चर्चा केली, तर सुमारे २० ते २२ लाख रुपये वीजबिल थकल्याने विद्युतपुरवठा खंडित करण्यात आल्याने सदर प्लांट बंद असल्याचे त्यांना समजले. कोकाटे यांनी वीज वितरणच्या मुख्य अभियंत्यांशी संपर्क साधून अत्यावश्यक बाब म्हणून या प्लांटची वीज जोडून देण्याची मागणी केली. त्यानुसार शनिवारी (दि.२४) या प्लांटचा वीजपुरवठा सुरू होईल. त्यातूनही दररोज सुमारे ५०० ते ६०० किलोलिटर ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकेल.
इन्फो
रेमडेसिविरबाबत मायलनशी चर्चा
माळेगाव औद्योगिक वसाहतीत मायलन कंपनीचा औषधांचा कारखाना आहे. मात्र रेमडेसिविर इंजेक्शन हे या कंपनीच्या परराज्यातील कारखान्यात तयार होते. सिन्नरमध्ये कारखाना असल्याने एक सहानुभूती म्हणून सिन्नरसाठी रेमडिसिविर इंजेक्शनचा पुरवठा व्हावा, यासाठी तहसीलदारांमार्फत या कंपनीशी बोलणे सुरू असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
फोटो- २३ सिन्रर कोकाटे
===Photopath===
230421\23nsk_31_23042021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ सिन्रर कोकाटे