सिन्नर : केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्षा मेघा दराडे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारविरोधात गॅस टाकीला हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलक महिलांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्र सरकारने वाढवलेल्या गॅसदरांमुळे सामान्य कुटुंबातील नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत दिलेले गॅसचे सिलिंडर आता पुन्हा भरून घेण्यासाठी गोरगरीब नागरिकांना अधिक पैसे भरावे लागत आहेत. याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी उपशहराध्यक्ष सरला गायकवाड, आफ्रीन रुबीना सय्यद, बेबी पगारे, अंजुम शेख, जिजाबाई वारुंगसे, रंजना बंगाळ, अनिता पगारे, गजरा शेख आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
--------------------
फोटोओळी : सिन्नर येथे गॅस दरवाढीचा निषेध करताना राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मेघा दराडे यांच्यासह महिला कार्यकर्त्या. (२३ सिन्नर एनसीपी)