सिन्नर: केंद्र सरकारच्याकांदा निर्यात बंदी लागू केल्याने सिन्नर तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. कांदा निर्यात बंदी रद्द करून कांदा निर्यात सुरू करावी अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले. यावेळी कांद्याची माळ ही भेट देण्यात आली. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदशर्नाखाली निवेदन देण्यात आले. केंद्र सरकार शेतकऱ्यांना सापत्य पूर्वक वागणूक देत आहे. शेतमालाला भाव मिळाल्यामुळे केंद्र सरकारने अचानक पणे केलेली कांदा निर्यातबंदी अन्यायकारक व जुलमी आहे. केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विरुद्ध निर्णय घेत आहे. अजूनही शेतकरी हिताचा निर्णय घेत ही निर्यातबंदी उठवावी व शेतकरी वर्गाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिन्नरच्या वतीने तालुक्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा युवक तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांनी दिला. याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जयराम शिंदे, राजाराम मुरकुटे, प्रमोद सांगळे, संदीप शेळके, राहुल आव्हाड,वामनराव पवार, तानाजी सानप, शुभम भारसाखळ, युवक उपतालुकाध्यक्ष निखिल गडाख, युवक सरचिटणीस प्रवीण जगताप,जीवितेश पाटील, सावजी बोडके, मेघा दराडे, गणेश वाघ, संदीप मुंगसे, ज्ञानेश्वर मुंगसे आदी उपस्थित होते.
सिन्नरला तहसीलदारांना कांदा माळ भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 4:11 PM
सिन्नर: केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी लागू केल्याने सिन्नर तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. कांदा निर्यात बंदी रद्द करून कांदा निर्यात सुरू करावी अश्या आशयाचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देण्यात आले.
ठळक मुद्देआमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदशर्नाखाली निवेदन देण्यात आले.