सिन्नरच्या संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करतांना शंकरराव वैरागकर. समवेत गोविंद लोखंडे, सोमनाथ पावसे, दिलीप बिन्नर व मान्यवर.सिन्नर : येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठान आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.यावेळी गुरुवर्य शंकरराव वैरागकर, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नगरसेवक सोमनाथ पावसे, ज्योती वामने, सिल्व्हर लोट्स स्कूलचे अध्यक्ष दिलीप बिन्नर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सतीष नेहे, अनिल पवार, अॅड. आविष्कार गंगावणे, अण्णासाहेब थोरमिसे, नारायण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरित करून गौरविण्यात आले. सागर कुलकर्णी व हितेश पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत अभंग, गौळण, भावगीत, भक्तिगीत व चित्रपट गीते, हार्मोनियम आदींचे सादरीकरण करण्यात आले. पंडित वैरागकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्यांना २५१ ते ११०१ रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती.स्पर्धेतील विजेते विद्यार्थी लहान गटात (गायक) सृष्टी खालकर, शंभूराजे पाटील, किरण कांबळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तर सिद्धी कुलकर्णी हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. (वादन समूहात) हर्षदा आढाव (हार्मोनियम), वैष्णवी सोमवंशी (हार्मोनियम), ज्ञानेश्वर वाघ (पखवाज) आदींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केले. तर राधिका गुजर (तबला) हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. स्पर्धेचे आयोजन ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक भारत मांडे यांनी केले. विजय निर्मळ व अनिता म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.मोठ्या गटात (गायनामध्ये) सागर भालेराव, ओमकार वाजे, गायत्री पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. तर (वादनामध्ये) वृषभ चौधरी यास उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. (वादनामध्ये देवेन मुसमाडे (गिटार), सुयोग थोरामिरे (तबला), ओमकार वाजे (हार्मोनियम) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. तर वृषभ चौधरी (हार्मोनियम) यास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
सिन्नरला गायन, वादन स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 6:25 PM
सिन्नर येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठान आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
ठळक मुद्देबक्षीस वितरण : १०६ विद्यार्थ्यांचा स्पर्धेत सहभाग, सृष्टी खालकर प्रथम