सिन्नर: तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्योसोबतच मृत्यूचे प्रमाणही दिवसागणकि वाढत असून शनिवारी विंचूरदळवी येथील 52 वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे तालुकावासियांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. दरम्यान, शनिवारी 41 रु ग्ण आढळून आल्याने तालुक्यातील रु ग्णसंख्या 1455 इतकी झाली आहे.तालुक्यातील विंचूर दळवी येथील 52 वर्षीय रु ग्णाचे नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये पहाटे 4 वाजता उपचार सुरू असतांना निधन झाले आहे. भाजीपाला घेऊन जाणार्?या ट्रकवर चालक असणार्?या या व्यक्तीची यापुर्वी एन्जोप्लास्टी झाली होती. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. सुरु वातीला ताप, खोकला आल्यानंतर 2-3 दिवस खासगी डॉक्टरकडे त्यांनी औषध उपचार घेतला होता. त्यात गुण न आल्याने भगुरला दुसर्?या डॉक्टरांना त्यांनी दाखवले. येथेही बरे न वाटल्याने डॉक्टरांनी त्यांना सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ते 4 दिवसांपूर्वी नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. तेथे ते कोरोना बाधीत असल्याचा अहवाल आला होता. तेथे उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबळींची संख्या 41 झाली आहे.आरोग्य विभागाला शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील 14 तर ग्रामीण भागातील 27 असे 41 रु ग्णांचे अहवाल पॉझििटव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बाधित रु ग्णांची संख्या 1455 झाली आहे. 1095 रु ग्णांनी कोरोना मात केली असून आजपर्यंत 43 रु ग्णांचा मृत्यू झाला आहे . सद्यस्थितीत 318 रु ग्णांवर ग्रामीण उपजिल्हा रु ग्णालय व रतन इंडियाच्या कोविड केअर सेंटर तसेच नाशिक येथील विविध शासकीय व खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.दरम्यान, कमी लक्षणे असलेले अनेक रु ग्ण आरोग्य विभागाच्या सल्यानुसार घरीच उपचार घेत आहेत. त्यात गरम पाणी पिणे, गरम पाण्याची वाफ घेणे, व्हिटॅमिन सी च्या गोळ्या घेणे या सह अनेक उपचारांचा समावेश आहे.
सिन्नर तालुक्यात 1095 रु ग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 9:14 PM
सिन्नर: तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्योसोबतच मृत्यूचे प्रमाणही दिवसागणकि वाढत असून शनिवारी विंचूरदळवी येथील 52 वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे तालुकावासियांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. दरम्यान, शनिवारी 41 रु ग्ण आढळून आल्याने तालुक्यातील रु ग्णसंख्या 1455 इतकी झाली आहे.
ठळक मुद्दे43 वा बळी; रु ग्णसंख्या 1455