सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत असून शनिवारी एका दिवसात सर्वाधिक २३ कोरोना बाधित रु ग्ण आढळून आल्याने तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या १६८ वर पोहचली आहे.शनिवारी (दि.४) शिवडे येथे ७, चास येथे ५, दोडी बुद्रुक येथे ४, पाटपिंप्री येथे ३ तर वडगाव- पिंगळा, मºहळ बुद्रुक, पांढुर्ली, विंचूर दळवी येथे प्रत्येकी १ रु ग्ण आढळून आला आहे. यातील मºहळ वगळता उर्वरीत सर्वच गावांतील रु ग्ण पहिल्या रु ग्णांच्या हायरीस्क कॉन्टॅक्टमधील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.शिवडे येथे १५ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय तरु ण, १९, २१ व २३ वर्षीय तरु णी, ४५ वर्षीय महिला व ५१ वर्षीय पुरु ष, चास येथे ३१, २७, ५० व ६२ वर्षीय पुरु ष, ४७ वर्षीय महिला, दोडी बु॥ येथे २९ वर्षीय महिला, ५ व १ वर्षीय मुलगी, ३५ वर्षीय पुरु ष, पाटपिंप्री येथे ३ वर्षीय मुलगा, १९ वर्षीय तरु णी, ८५ वर्षीय महिला, वडगाव-पिंगळा येथे ७२ वर्षीय महिला, मºहळ बु॥ येथे ४३ वर्षीय पुरु ष व पांढुर्ली येथे ४५ वर्षीय पुरु षाचा अहवाल पॉझििटव्ह आला आहे. तर २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आत्तापर्यंत ८९ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.