सिन्नर:.तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकर्?यांच्या हातचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतिपकांचे ग्रामस्तरीय समतिीतर्फे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिले आहेत. तहसीलदार कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृषी सहाय्यक, तलाठी आण िग्रामसेवक यांच्या त्रिस्तरीय ग्रामस्तरीय समतिीस पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.कृषी विभागाच्या पाहणीत प्राथमिक टप्प्यात तालुक्यातील 33 गावांमधील सुमारे 700 हेक्टरहून अधिक क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. या व्यतिरिक्तही ज्या गावांमध्ये शेतकर्?यांचे नुकसान झाले असेल तेथील ग्रामस्तरीय समतिीने नुकसानीचे पंचनामे करून एकित्रत अहवाल शासनास सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पालक अधिकार्?यांची ग्रामस्तरीय समतिी गठीत करण्यात आली आहे. शेतकर्?यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेशी संबंधित अभिलेख तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत विमा कंपनीकडे पाठवण्यात येतील. तर विमा न काढलेल्या मात्र 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्?यांच्या नुकसानीचे पंचनामे व गोषवारा तलाठ्यांमार्फत तहसील कार्यालयात सादर करण्यात येणार आहे. कामात हलगर्जी करणार्?यांवर कारवाई करण्यात येणार आहे.निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी चित्ते, कृषी पर्यवेक्षक दिलीप डेंगळे यांची पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुसळगाव, कुंदेवाडी, गुळवंच, ठाणगाव, आशापुर, पाडळी, हिवरे, पिंपळे, सोनारी, कृष्णनगर, डुबेरे, चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी, नांदुरशिंगोटे, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, दापुर, गोंदे, शिवाजीनगर, दत्तनगर, पाटोळे, धोंडवीरनगर, कोळगाव माळ, पिंपरवाडी, वावी, मिरगाव, शहा, पाथरे बुद्रुक, वारेगाव व पाथरे खुर्द या गावांमध्ये नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याव्यतिरिक्तही ज्या गावांतील शेतकर्?यांचे नुकसान झाले आहे, तेथेही पंचनामे करण्यात येणार आहे.नुकसानीचे पंचनामे करताना शेतजमीन व पिकांचे सर्वे नंबर / गट नंबर दाखवणे, सातबारामध्ये नोंद नमूद केलेल्या क्षेत्राप्रमाणे आपदग्रस्त क्षेत्र जुळविण्याची जबाबदारी तलाठ्यांवर असणार आहे. तर नुकसान झालेल्या पिकांचे जीपीएस फोटो मोबाइलवर काढून ते शासकीय संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम ग्रामसेवकास करावे लागणार आहे. नुकसानीची टक्केवारी ठरवण्याची जबाबदारी कृषी सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे.
सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीने 33 टक्क्यांहून अधिक नुकसानीचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 2:30 PM
सिन्नर:.तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या टप्प्यात आलेल्या पिकांना पावसाने झोडपल्याने शेतकर्?यांच्या हातचा घास हिरावला गेला आहे. त्यामुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतिपकांचे ग्रामस्तरीय समतिीतर्फे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार राहुल कोताडे यांनी दिले आहेत.
ठळक मुद्देग्रामस्तरीय समतिीस पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना