उपाध्यक्षपदी वाघ: सिन्नर तालुका कार्यकारिणीची निवड
सिन्नर : सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी रामहरी वारुंगसे, उपाध्यक्षपदी कृष्णा वाघ तर सचिवपदी सचिन बोरसे यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या वतीने जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सिन्नर-घोटी महामार्गावरील आई भवानी डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्ष शिरीष ठाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २०२१ ते २०२३ साठी नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
कोषाध्यक्षपदी योगेश घुगे, कार्याध्यक्षपदी अजहर मणियार, संपर्कप्रमुख म्हणून दशरथ देसाई, ग्रामीण संपर्क प्रमुख प्रकाश गिते यांच्या निवडी करण्यात आल्या.
ज्येष्ठ छायाचित्रकार हरीश लोणारे यांनी जागतिक छायाचित्र दिनाची माहिती दिली. योगेश घुगे यांनी आभार मानले. यावेळी दौलत क्षीरसागर, राम आव्हाड, नारायण आभाळे, समाधान चव्हाण, बापू घोडे, मनीष शिंदे, पंकज राऊत, सतीश आव्हाड, गोविंद नाना, समीर दराडे, राजू जाधव, शरद नागरे, धनंजय थोरात, सागर थोरात, गणेश तांबे, संदीप निचळ, कैलास नवले, कैलास केदार, केशव पवार, जनार्दन पवार, हरीश लोणारे, चेतन गोरडे, आकाश मधुरकर, शुभम शिंदे, किसन तांबे, दत्ता जोशी आदी उपस्थित होते.
(२४ सिन्नर ४) सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या कार्यकारिणी निवडीप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.
240821\24nsk_29_24082021_13.jpg
सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या निवडप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.