सिन्नर : दिव्यांग नागरिकांना लस घेताना रांगेत उभे राहावे लागू नये व गर्दीमुळे दिव्यांग नागरिकांना त्रास होऊ नये, त्यामुळे त्यांना प्राधान्य देऊन विनाअडथळा लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सिन्नर नगर परिषद कार्यक्षेत्रातील केवळ दिव्यांग बांधवांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे ३० वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देणे सुरू केले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे दिव्यांग नागरिकांना लस घेताना रांगेत उभे राहावे लागू नये व गर्दीमुळे दिव्यांग नागरिकांना त्रास होऊ नये, त्यामुळे त्यांना प्राधान्य देऊन विनाअडथळा लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सिन्नर नगर परिषद कार्यक्षेत्रातील केवळ दिव्यांग बांधवांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी प्रशासनाद्वारे लोकनेते शं. बा. वाजे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरात वास्तव्यास असलेल्या एकूण दिव्यांगांपैकी ११९ दिव्यांगांना एकाच दिवशी लस देण्यात आली.जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, मुख्याधिकारी संजय केदार, डॉ. प्रशांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, वर्षा साळुंके, कांचन सानप, पुष्पा वैलकर, अनुसया भांसी यांनी समन्वयाचे कार्य करत सिन्नर शहरातील दिव्यांगांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून लसीकरणाबाबत माहिती देण्याचे काम केले.
सिन्नर तालुका दिव्यांग प्रहार संघटनेचे पदाधिकारी अरुण पाचोरे, चंद्रकांत पवार व संघटनेचे सदस्य यांनी दिव्यांग यांना लस मिळण्यासाठी साहाय्य केले. लस मिळाल्याबद्दल सर्व दिव्यांगांनी समाधान व्यक्त केले. कर निरीक्षक सचिन कापडणीस, बांधकाम अभियंता मयूरी नवले, तुषार लोखंडे, विजय वाजे, नर्स सुनीता जगताप, आशा स्वयंसेविका कल्याणी मोरे, सुनीता लोंढे, चंद्रकांत बोडके, प्रणव सांगळे यांनी लसीकरणाचे काम पाहिले.