सिन्नर : अन्नपाण्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या हरणाच्या जोडीतील नराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तर घाबरलेल्या गर्भवती मादीने पुलावरून उडी घेतल्याने हरणाच्या जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सरदवाडीजवळील वळण रस्त्यावर घडली.सरदवाडी धरण परिसरात अन्नपाण्याच्या शोधार्थ हरणाचं जोडपं आलं होतं. जवळून जाणाºया नाशिक-पुणे वळण रस्त्यावरून जात असताना पहाटे ५.३०च्या सुमारास रस्त्यावरील पुलावर भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने या जोडप्यातील नर हरणाला जबर धडक दिली. या अपघातात नराच्या डाव्या पायाला जबर मार लागला तर घाबरलेल्या हरणाच्या मादीने पुलावरून खाली उडी मारली.वाजे यांनी तात्काळ युवामित्र संस्थेच्या रुग्णवाहिकेला पाचारण करून या रुग्णवाहिकेतून मादी व नर हरणाला उपचारार्थ पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविले. तेथे पशुधन विकास अधिकारी डॉ. योगेश दुबे व डॉ. मिलिंद भणगे यांनी जखमी नरावर उपचार सुरू केले; मात्र उपचारा-दरम्यान नर हरणाचीही प्राणज्योत मालवली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर दोन्ही हरणांचे मृतदेह मोहदरी वनउद्यानात दफन करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.अतिरक्तस्रावाने मृत्यूसुमारे ३० ते ४० फूट उंचावरून गर्भवती असलेली मादी पोटावर पडली. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला तर वर रस्त्यावर नर हरीण जखमी अवस्थेत पडून होते. त्यानंतर काही वेळाने जवळून जाणाºया स्थानिक नागरिकांनी हरणांच्या अपघाताचे दृश्य पाहून माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना दुरध्वनीवरून माहिती दिली.