सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागातील उजनी येथील शेतकरी रामहरी सुरसे यांची तीन एकर चंदनाची शेती आहे. सुमारे साडेचार वर्षापूर्वी सुरसे यांनी तीन एकरात चंदनाची एक हजार झाडे लावली. साडेचार वर्षात सदर झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. झाडांची उंची वाढावी यासाठी खाली बुंद्याजवळ असलेल्या फांद्या छाटण्यात येतात. सुमारे एक हजार झाडांची छाटणी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चंदनाच्या झाडांचे सरपण तयार झाले. सदर सरपण वाळल्यानंतर या चंदनाचे काय करायचे, असा प्रश्न सुरसे यांच्यासमोर होता.
हिंदू संस्कृतीत अग्निडाग देताना चंदनाला अन्यन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेकजण अंत्यविधीला चंदनाची लाकडे नाही तर पाला असलेला फांद्या तरी आणत असतात. हीच गरज ओळखून सुरसे यांनी चंदनाच्या वाळलेल्या सरपणाच्या मोळ्या बांधण्यास प्रारंभ केला. सुमारे दोन किलोची एक मोळी तयार करण्यात आली. अशा दोनशे मोळ्या तयार करण्यात आल्या. सुरसे यांनी सिन्नरच्या नगरसेवक शीतल कानडी व सामाजिक कार्यकर्ते हर्षल देशमुख यांच्याशी संपर्क साधला व सदर चंदनाच्या मोळ्या अग्निडाग देण्यासाठी सिन्नर नगरपरिषदेच्या संगमनेर नाक्यावरील स्मशानभूमीत दान देण्याबाबत चर्चा केली. प्रत्येक अंत्ययात्रेला एक चंदनाच्या सरपणाची मोळी देण्याबाबत चर्चा झाल्यानंतर एका टेम्पोत लाखमोलाचे चंदनाचे सरपण भरून सिन्नरच्या स्मशानभूमीत रवाना करण्यात आले. त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक अंत्ययात्रेला चंदनाच्या सरपणाची एक मोळी विनामूल्य दिली जाणार आहे.
कोट.....
‘माझ्याकडे चंदनाची एक हजार झाडे आहेत. झाडांची उंची वाढविण्यासाठी सदर झाडाच्या फांद्या छाटाव्या लागतात. त्यातून चंदनाचे मोठे सरपण तयार झाले. अनेकजण अंत्ययात्रेला चंदनाच्या फांद्या घेण्यासाठी आपल्याकडे येत असतात. त्यामुळे वेस्टेज चंदनाच्या सरपणाचा सदुपयोग करण्याचा मी निर्णय घेतला. चंदनाच्या सरपणाच्या २०० मोळ्या बांधून सिन्नरच्या स्मशानभूमीत पोहोच केल्या. प्रत्येक अंत्ययात्रेला एक चंदनाची सरपणाची मुळी विनामूल्य देण्याची सोय केली आहे.
- रामहरी सुरसे, शेतकरी, उजनी
फोटो - १० चंदन फार्मर
सिन्नर तालुक्यातील उजनी येथील चंदनाची शेती असलेले शेतकरी रामहरी सुरसे यांनी सुमारे दोनशे चंदनाच्या मोळ्या नगरसेवक शीतल कानडी, हर्षल देशमुख व विलास पठाडे यांच्यामार्फत सिन्नरच्या स्मशानभूमीत सुपुर्द केल्या.
===Photopath===
100521\10nsk_31_10052021_13.jpg
===Caption===
फोटो - १० चंदन फार्मर सिन्नर तालुक्यातील उजनी येथील चंदनाची शेती असलेले शेतकरी रामहरी सुरसे यांनी सुमारे दोनशे चंदनाच्या मोळ्या नगरसेवक शीतल कानडी, हर्षल देशमुख व विलास पठाडे यांच्यामार्फत सिन्नरच्या स्मशानभूमीत सुपूर्द केल्या.