पूरग्रस्तांना मदत पोहोचिवण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य सीमंतीनी कोकाटे यांनी पुढाकार घेतला. येथील सिन्नर बस स्थानकावरून मदत फेरी काढून शहरातील नागरिकांना मदतीची हाक दिली. त्यानंतर शहरातील नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सिन्नर बस स्थानकातून नियोजित केरळ पुरग्रस्तांसाठी दुपारी बारा वाजता मदत फेरी सुरू झाली. या फेरीचा मार्ग नेहरु चौक, सरस्वती पूल, बाजारातून नाशिक वेस, लाल चौक, शिंपी गल्लीतून शिवाजी चौक, तानाजी चौक वावी वेस पर्यंत फेरी काढण्यात आली. येथील आडव्या फाट्यावर उभारण्यात आलेल्या मदत केंद्रावर फेरीची सांगता करण्यात आली. आडव्या फाट्यावरील केरळ पूरग्रस्त मदत केंद्र गुरुवार (दि. २३) रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. फेरी पूर्ण झाल्यानंतर ज्या शहरातील व तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना सढळ हाताने करावयाची आहे त्यांच्यासाठी हे केंद्र सुरू ठेवले असल्याची माहिती कोकाटे यांनी दिली. जमा झालेली सर्व सामुग्री तत्काळ केरळला पाठविण्यात येणार आहे. यावेळी शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने सीमंतीनी कोकाटे, अनिल वराडे, हर्षद देशमुख, पंकज जाधव, शशी गाडे, कृष्णा कासार, बापू गोजरे, बाळासाहेब कमानकर, राजेंद्र चव्हाणके, प्रशांत सोनवणे, शिवाजी कुंभार, आशिष नवसे, पाडुरंग वारुंगसे, दर्शन कासट , विनायक तांबे, आश्विनी देशमुख, शीतल कानडी, वासंती देशमुख, उज्वला खालकर, सविता कोठुरकर, लता चव्हाणके, इंदूमती कोकाटे, मालती भोये, चित्रा लोंढे, रामभाऊ चव्हाणके यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
केरळच्या पूरग्रस्तांना सिन्नरकरांचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 9:24 PM