सिन्नर: 'स्वच्छता आपण राखूया, कोरोनाला हरवूया' असे घोषवाक्य घेवून कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी जनसामान्यांच्या मार्गदशर्नासाठी सज्ज झालेल्या चित्ररथाचे प्रदर्शन सिन्नर पंचायत समिती आवारात अनावरण करण्यात आले. नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग यांच्या साह्याने सेव्ह द चिल्ड्रन आणि सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टीव्हीटीज या संस्थेच्या मार्गदशर्नाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकडे यांचे हस्ते चित्ररथाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे, गट विकास अधिकारी लता गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, पशुधन अधिकारी डॉ. मिलींद भणगे, कृषी विस्तार अधिकारी के. एल. भदाणे, रवी पवार, सेव्ह द चिल्ड्रनचे प्रकल्प समन्वयक धनंजय दिघे, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टीव्हीटीजचे योगेश पाटील , भाऊसाहेब शेळके, विकास मस्के आदी उपस्थित होते.------------------------------------------सिन्नर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे प्रयत्नातून सदर चित्ररथ तालुक्यातील २० गावांत प्रबोधन करणार आहे. कोरोना विरुद्ध लढण्याचे कार्य प्रात्यक्षिक, संदेश व दक्षता पूर्ण बाबीतून समाजाला, गावांना समजवण्याचे कार्य या चित्ररथाच्या माध्यमातून केले जाणार आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. तर नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी चित्ररथाला शुभेच्छा दिल्या. अशोक सोनकांबळे सूत्रसंचालन केले.--------------------------------------
सिन्नरला कोरोना जनजागृतीसाठी चित्ररथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 1:03 PM