सिन्नर : मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दोन दिवसीय विशेष मोहीम सिन्नर विधानसभा मतदारसंघामार्फत असलेल्या सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात आली.भारत निवडणूक आयोग व राज्य मुख्य निवडणुक अधिकारी यांच्यामार्फत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका विचारात घेऊन १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही, अशा वंचित नागरिकांना नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी व त्यांचा मतदारयादीत समावेश करण्यासाठी मतदारयाद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्याचे घोषित केले होते.सदर मोहिमेत वंचित व नवीन पात्र मतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच नावात दुरुस्ती, वगळणी, स्थलांवर करून मतदार यादीचे अद्ययावतीकरण व सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. मतदारांनी आपले व कुटुंबीयांचे नाव मतनदार यादीमध्ये समाविष्ट आहे याची खात्री केली. मतदारयादीत नाव नसल्यास मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना अर्ज ६ भरून संबंधित मतदान केंद्रांवर देण्यात यावा.सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार राहुल कोताड यांच्यासह निवडणूक शाखेने परिश्रम घेतले.
सिन्नरला मतदारयाद्या पुनरीक्षण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 6:51 PM