शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

सिन्नरचा नाशिकस्थित तरुण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 10:35 PM

कोरोनामुक्त झालेल्या सिन्नर शहरातील नाशिकस्थित ३० वर्षीय युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. हा रुग्ण गेल्या आठवड्यात सिन्नरच्या एका वस्तीत येऊन गेल्याने त्याच्या कुटुंबातील चौघांसह शहरातील खासगी डॉक्टर आणि नर्स यांना उपचारासाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देखासगी डॉक्टर, नर्ससह सहा संशयितांचे घेतले स्वॅब

सिन्नर : कोरोनामुक्त झालेल्या सिन्नर शहरातील नाशिकस्थित ३० वर्षीय युवकाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. हा रुग्ण गेल्या आठवड्यात सिन्नरच्या एका वस्तीत येऊन गेल्याने त्याच्या कुटुंबातील चौघांसह शहरातील खासगी डॉक्टर आणि नर्स यांना उपचारासाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.नाशिकच्या फुलेनगर भागात वास्तव्यास असलेला हा युवक मूळचा सिन्नरच्या जोशीवाडीतील असून, गेल्या आठवड्यात तो सिन्नरला आला होता. या रुग्णास त्रास जाणवल्याने उपचारासाठी तो सिन्नर शहरातील एका डॉक्टरांकडे गेला होता. दोन दिवसांपूर्वी सदर रुग्णाचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणलेआहे.हा रुग्ण नाशिक येथे वास्तव्यास असल्याने तिथेच कंटेन्मेंट झोन होणार असला तरी रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील चौघे, एक डॉक्टर आणि नर्स अशा सहा संशयितांना हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणून सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड यांनी दिली. त्यामुळे काहीशा बिनदास्त वावरणाऱ्या सिन्नरकरांची चिंता वाढली असून, त्यांचे लक्ष या सहा रुग्णांच्या अहवालाकडे लागले आहे.सिन्नर तालुक्यातील जामगाव येथील ७० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. या महिलेचे पायाचे हाड फॅक्चर झाल्याने शस्त्रक्रियेसाठी तिला नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सदर महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात ती पॉझिटिव्ह आढळून आली. महिला कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तहसीलदार राहुल कोताडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी जामगाव येथे जाऊन पाहणी केली. सदर महिलेच्या संपर्कातील बारा हाय रिस्क नागरिकांना सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर लो रिस्कमधील १८ नागरिकांना होम क्वॉरण्टाइन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जामगाव-चंद्रपूर रस्ता कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य