सिन्नर ः शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून सोमवरी झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 18 तर ग्रामीण भागातील 3 असे एकुण 21 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून कोरोना बाधितांची संख्या 602 वर पोहचली आहे.
शहरातील आर्दश नगर येथे 48 वर्षीय पुरुष, सरदवाडी रोडवर 53 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर मध्ये 15, 36 व 40 वर्षीय पुरुष, वृंदावन नगर 29 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक, विजय नगर 65 वर्षीय महिला व 13 वर्षीय मुलगा, वैदूवाडी 30 वर्षीय युवक, नाशिसवेस 75 वर्षीय महिला, काजीखोरे 39 वर्षीय पुरुष, शिक्षक कॉलनी 13 वर्षीय मुलगा व 38 वर्षीय महिला, लालचौक महालक्ष्मी रोड 19 वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगी, 40 वर्षीय महिला व 42 वर्षीय पुरुष तर ग्रामीण भागात गुळवंच येथे 74 वर्षीय पुरुष, माळेगाव एमआयडीसी येथे 30 वर्षीय महिला, सरदवाडी येथील 60 वर्षीय महिला असे तालुक्यात एकुण 21 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यात एकुण 602 कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. 443 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 15 जणांचा मृत्यू झालेला आहे. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नोडल अधिकारी डॉ. लहू पाटील, ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ. निर्मला गायकवाड, नगरपालिका दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी दिली.