शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मिळाला आपुलकी व जिव्हाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 6:27 PM

सिन्नर: रुग्णांचे आरोग्य हे हॉस्पिटलच्या चार भिंतींच्या आत नव्हे तर घरगुती वातावरणात सुधारते ही गोष्ट हेरून आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वातावरण दिवाळी सणाच्या निमित्ताने घरगुती पद्धतीने बनवण्याची मांडलेली कल्पना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणल्याने रुग्णालयात दिवाळी सणाच्या माध्यमातून आपुलकी व जिव्हाळा वृद्धिंगत झाला.

ठळक मुद्देदिवाळ सण: वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रूग्णांसोबत केली दिवाळी साजरी

सिन्नर: रुग्णांचे आरोग्य हे हॉस्पिटलच्या चार भिंतींच्या आत नव्हे तर घरगुती वातावरणात सुधारते ही गोष्ट हेरून आमदार माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वातावरण दिवाळी सणाच्या निमित्ताने घरगुती पद्धतीने बनवण्याची मांडलेली कल्पना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणल्याने रुग्णालयात दिवाळी सणाच्या माध्यमातून आपुलकी व जिव्हाळा वृद्धिंगत झाला.

उपचार घेण्यासाठी येणारे रुग्ण, त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स व इतर स्टाफ, त्यामुळे रुग्णालयाच्या चार भिंतीच्या आत प्रत्येक रुग्णाची सुरू असलेली सुश्रुषा व त्यामुळे संपूर्ण वातावरणच न कळत तणावाचे राहत असते. त्यातून रुग्ण बरा होण्यासही वेळ लागतो. जिथे काम करतो,राहतो, खेळतो, खातो, झोपतो अशा हक्काच्या जागेत म्हणजे स्वतःच्या घरात मनुष्य अधिक आनंदी असतो व अशा वातावरणात आजारी पडलेला मनुष्य लवकर बरा होतो,ही गोष्ट हेरून सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात दिवाळी सणाच्या निमित्ताने घरगुती वातावरण तयार करून वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रूग्णांसोबत दिवाळी साजरी करण्याची आमदार माणिकराव कोकाटे यांची संकल्पना प्रत्यक्षात अमलात आल्याने उपजिल्हा रुग्णालयास जणू एखाद्या पॅलेसचे रूप आले आहे. डॉ. निर्मला पवार, डॉ.प्रशांत खैरनार, डॉ.भालेराव, डॉ कानवडे, डॉ.श्रीमती ठाकरे, डॉ.चौधरी, डॉ वाळवे, डॉ.पाटील, डॉ.साळुंखे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. कचरू डावखर, हर्षद देशमुख आदींनी कोकाटेंच्या सूचनेवरून या ठिकाणी रुग्णांना मिठाईचे वाटप केले.रांगोळ्या व आकाश कंदिलाने उत्साह द्विगुणितआमदार कोकाटे यांच्या दृष्टिकोनातून बांधलेला हे उपजिल्हा रुग्णालय त्याच्या भव्यते व स्वछतेमुळे सरकारी वाटत नाही.कोकाटे यांनी सीएसआर व अन्य माध्यमातून मोठी मदत मिळवून आणत रुग्णालयाची गरज भागविली.अनेक उद्योजक व व्यवसायिकांनीही मोठी मदत या ठिकाणी केली आहे.पिण्याचे पाणी गरम करण्याच्या यंत्रापासून ते रुग्णांच्या वॉर्ड मध्ये टीव्ही संच बसविण्यात आले आहे.एकंदरीत या रुग्णालयास लक्झरीयस लुक देण्याचे काम कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.अशा या रुग्णालयात दिवाळीच्या सणामुळे मोठमोठ्या सुबक व देखण्या अशा रांगोळ्या मनीषा आव्हाड,प्रियांका गायकवाड,शांती सदागिर,सुवर्णा गीते,मोमीन खतीब,अशपाक शेख,गणेश झुटे,राम लोंढे यांनी काढल्या असून त्या रुग्णालयाचे सौंदर्य वाढवण्याबरोबरच त्या ठिकाणचे वातावरण हे घरगुती बनवण्यास मदत करत आहे.दिवाळीच्या दिवशी रुग्णालयात असलेल्या २५ कोविड रुग्णांच्या चेहऱ्यावरील भीतीही हे वातावरण पाहून नाहीशी झाल्याचे दिसत होते.रुग्णांचा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न'कोविड रुग्णालयात रुग्ण हे नातेवाईकांपासून दूर असतात. त्यांना एकटेपणामुळे ताणतणाव,चिंता या गोष्टी सतावतात.यावर मात करण्यासाठी उपाय सुचविले व डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांचे इतर आजार पाहून कार्यकर्त्यांमार्फत मिठाई वाटप केली.घरापासून दूर असणाऱ्या रुग्ण व वैद्यकीय स्टाफची दिवाळी गोड झाली.-माणिकराव कोकाटे, आमदार. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल