सिन्नर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले. मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील केशव मूळचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) गावचे होते.मराठा लाइट इन्फन्ट्रीची तुकडी गस्त घालत असता शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकच्या बाजूने ‘स्नायपर’हल्ला झाला. त्यात केशव हेशहीद झाले. भारतीय लष्करानेया हल्ल्याला उत्तर देऊन पाकिस्तानी चौक्यांचे नुकसान केले.या हल्ल्यात जवान केशव गोसावी यांना गोळी लागून ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आले.आज अंत्यसंस्कारशहीद गोसावी यांचे पार्थिव विमानाने सोमवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत ओझर विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत पार्थिव शिंदेवाडी येथे आणण्यात येणार आहे.शिंदेवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. १९९० मध्ये जन्म झालेले केशव गोसावी २००९ मध्ये लष्करामध्ये दाखल झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. गोसावी यांचे प्राथमिक शिक्षण शिंदेवाडी येथे, माध्यमिक शिक्षण पंचाळे येथे तर १२ वी पर्यंतचे शिक्षण वावी येथे झाले आहे.
सिन्नरचा जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 2:01 AM
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले. मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील केशव मूळचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) गावचे होते.
ठळक मुद्देकाश्मीरमध्ये वीरमरण शिंदेवाडीत आज दुपारी पार्थिव पोहोचणार