नाशिक :सिन्नर येथील डुबेरेनाका परिसरातील खासगी रु ग्णालयात वैद्यकीय सेवा देणार्या एका 30 वर्षीय तरुण डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिन्नरकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. सिन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता सहा झाल्याने काळजी वाढली आहे.सिन्नरच्या ग्रामीण भागात यापूर्वी चार कोरोना बाधित रु ग्ण आढळून आले होते. त्यानंतर गेल्या पाच दिवसांपूर्वी शिवाजीनगर परिसरातील 86 वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा झाली होती. नाशिक येथील खासगी रु ग्णालयात उपचार घेत असताना सदर रुग्णांचा अहवाल बाधा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर वृध्दाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील 17 व त्याने सिन्नरला ज्या खासगी रु ग्णालयात उपचार घेतले तेथील 10 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्या 27 जणांना कोरोटाइन करण्यात आले होते. या 27 जणांपैकी 26 जणांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी सिन्नरचे खासगी रु ग्णालयातील 30 वर्षे डॉक्टरला कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर उर्विरत वृद्धाच्या कुटुंबातील सर्वच्या सर्व 17 जण निगेटिव्ह निघाले आहेत. तर रु ग्णालयातील दहापैकी नऊ जण निगेटिव असून रु ग्णावर उपचार करणार्या 30 वर्षे डॉक्टरला कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे सिन्नरच्या शहराची चिंता वाढली आहे. दरम्यान, सदर डॉक्टरच्या संपर्कात येणार्या रु ग्ण व नातेवाईक यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्छाव यांनी दिली.हॉस्पिटल व परिसर सीलसिन्नर शहरातील डुबेरे नाका परिसरातील खासगी रु ग्णालय सील करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून परिसर सील करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी संजय केदार यांनी दिली.
सिन्नरला 30 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 6:10 PM
सिन्नरकरांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. सिन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता सहा झाल्याने काळजी वाढली आहे.
ठळक मुद्देरुग्णसंख्या सहा झाल्याने चिंता वाढलीहॉस्पिटल व परिसर सील