वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे, नोडल अधिकारी डॉ. वैभव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरण अधिकारी संगीता शिंदे, जयश्री लांडगे, अमोल ह्याळीज, वॅक्सिनेटर दीपाली केदार यांनी नागरिकांना लस दिली.
कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात सुमारे २५५० कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, प्रशासन व इतर कोरोना योद्ध्यांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सामान्य व्यक्तींनाही कोरोना लस घेता येणार आहे. यासाठी नागरिकांना को-विन या मोबाईल अॅप्लिकेशन किंवा वेबसाईटवर नाव नोंदणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
अॅप्लिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने लसीकरण मोहिमेत अडथळा येत आहे. मात्र नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. खासगी सेंटर सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून खासगी दवाखान्यातही लसीकरण सुरू होऊ शकते. तसे झाल्यास सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होईल. २५ जानेवारीपासून कोरोना योद्ध्यांसह ज्येष्ठ व व्याधीग्रस्त अशा जवळपास २८०० नागरिकांनी लस टोचून घेतल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा लहाडे यांनी दिली.
फोटो - ०५ कोरोना सिन्नर
सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांना लसीकरण करताना आरोग्य कर्मचारी.
===Photopath===
050321\05nsk_14_05032021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ कोरोना सिन्नर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठांना लसीकरण करतांना आरोग्य कर्मचारी.