राज्य सरकारकडून शनिवार, रविवारी कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. रात्री उशिरा जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास शासनाने हिरवा कंदील दाखविला होता; मात्र हा आदेश पोलीस प्रशासनाकडून शहरात फारसा अमलात आणला गेला नाही. केवळ वैद्यकीय विभागाशी संबंधित अस्थापनांचा अपवाद वगळता किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रीसह सर्व काही बंद ठेवण्यावर पोलिसांकडून भर दिला गेला. वीकेण्डला शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत कडक निर्बंधांची अंमलबजावणी केली गेली. तरीदेखील बहुतांश ठिकाणी मास्क न लावता नागरिकांचा वावर पोलिसांना आढळून आला. या दोन दिवसांत पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या ३९२ निष्काळजी लोकांकडून १ लाख ९५ हजारांचा दंड वसूल केला, तसेच सार्वजनिक थुंकण्यास सक्त मनाई करण्यात आली असली तरीदेखील सर्रास नागरिक रस्त्यावर थुंकत असल्याचे चित्र शहरात आजही पहावयास मिळत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये रिक्षाचालकांची आघाडी असल्याचे दिसते. मास्क हनुवटीवर घेत गुटख्याची पिचकारी रस्त्यावर थुंकत रिक्षा दामटविणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. सामाजिक अंतर राखण्याबाबतदेखील काही ठिकाणी उदासिनता पहावयास मिळाली. यामुळे सामाजिक अंतर न राखणाऱ्यांविरुद्धही पोलिसांकडून कारवाई केली गेली.
----इन्फो----
रविवारी झालेली कारवाई
रविवारी मास्क विना वावरणाऱ्या १९१ लोकांकडून ९५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या १६ लोकांवर कारवाई करत पोलिसांनी १६ हजारांचा दंड वसूल केला. वेळमर्यादेसह अन्य कुठलेही नियम न पाळल्याने १९ अस्थापनाचालकांना एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ७ लोकांना दहा हजारांचा दंड ठोठावला गेला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ३० लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.
---इन्फो--
शनिवारी झालेली कारवाई
शहरात शनिवारी विना मास्क फिरणाऱ्या २०१ लोकांवर दंडात्मक कारवाई करत एकूण १ लाख ५०० रुपयांचा दंड वसूल केला गेला. सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या १० लोकांकडून दहा हजारांचा दंड घेण्यात आला, तसेच १३ अास्थापनांवर पोलिसांनी कारवाई करत ६१ हजारांचा दंड ठोठावला. ९ लोकांनी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे ७ लोकांकडून ७ हजारांचा दंड वसूल केला गेला. २८ संशयितांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यामध्ये ४ नागरिक कोरोनाबाधित आढळून आले.
---इन्फो--
बाहेर पडण्याची कारणे एकसारखीच....
संचारबंदीचे उल्लंघन करत बाहेर पडलेल्या नागरिकांकडून एकसारखीच वैद्यकीय गरजेची कारणे पुढे केली गेली. कोणी सांगितले, मेडिकलमध्ये गेलो होतो, तर कोण म्हणाले, दवाखान्यात जातोय तर काहींनी डायग्नोस्टिक सेंटरची नावे पुढे करत विविध चाचण्या करण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले. एकूणच वैद्यकीय कारणांंचा भडीमार नाकाबंदीच्या ठिकाणी नागरिकांकडून पोलिसांसमोर केला जात होता. यावेळी पोलिसांनी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अथवा फाइल दाखविण्यास सांगितले. ज्यांनी हे पुरावे सादर केले ते दंडात्मक कारवाईतून सुटले आणि उर्वरितांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले.
-----
डमी फॉरमेट आरवर ११डमी विकेन्ड लॉकडाऊन पोलीस ॲक्शन नावाने सेव्ह.
फोटो : ११कुंडी,/ ११पोलीस/ ११पोलीस१ नावाने सेव्ह आहे.
--
मुख्य फोटो ३ कॉलम : पोलीस कारवाईचा : १२पीएचएपी७७/७८ (डेस्कॅन वर)