नाशिक शहरात काेरेानाबाधितांची संख्या कमी झाली असली, तरी धोका अजून टळलेला नाही. त्यातच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीत नाशिक शहरात सामूहिक प्रतिकारशक्ती तपासण्याचा निर्णय घेण्यात आला हेाता. त्यानुसार, शनिवारपासून (दि.९) सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी १ हजार ६७ नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आल्याची माहिती डॉ.बापुसाहेब नागरगोजे यांनी दिली.
सामूहिक प्रतिकारशक्ती तपासण्यासाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोेहीम राबविली जात आहे. त्यासाठी चाळीस वैद्यकीय पथके तयार करण्यात आली असून, १८ विविध भागांतील अडीच हजार नागरीकांचे रक्तनमुने तपासणी करण्यात येणार आहे. साेमवारपर्यंत (दि.११) ही मोहिम राबविली जाणार असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.नागरगोजे यांनी केले आहे.