कळवण : तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धूमशान सुरू झाले असून, कळवण खुर्द, शिरसमणी, कुंडाणे (ओ) व जयपूरच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, बारा ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदासाठी १७ उमेदवारांनी माघार नोंदविल्याने ३३ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने जोरदार चुरस निर्माण झाली आहे.कळवण खुर्द, कुंडाणे (ओ) व जयपूर ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली असून, १४ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकीतून ७६ इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदविल्याने ६७ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर आठ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या जागा रिक्त राहणार आहेत.आॅक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान मुदत संपणाºया तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबरला तालुक्यात मतदान होणार असल्याने गावपातळीवर प्रचाराने जोर धरला आहे. हायटेक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून, स्थानिक पुढाºयांसह त्यांना मानणाºया नेत्यांचीही प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. यंदा पहिल्यांदाच गावचा सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार असून, त्या पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने लोकनियुक्त १२ गावांतील सरपंचपदासाठी ३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. १४ ग्रामपंचायतींच्या ६४ जागांसाठी १३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने जोरदार रस्सीखेच होईल असे दिसून येते आहे. थेट सरपंचपदासाठीच्या १२ जागांसाठी ३३ (कोसुर्डे- २, पिळकोस- ३, देसराणे- २, मानूर- ४, भादवण- ३, पाळे खुर्द- २, वाडी बु.-३, बगडू- २, गोळाखाल- ५, जयदर-३, निवाणे- २, सुळे- २) उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ६४ जागांसाठी १३२ उमेदवार रिंगणात- कोसुर्डे ग्रामपंचायतमध्ये ३ प्रभागांतील ९ जागांपैकी ५ जागा बिनविरोध झाल्या असून, त्यात एकनाथ बागुल, प्रभाबाई गायकवाड, निर्मला बागुल, प्रमिला वाघ व एकनाथ वाघ यांचा समावेश आहे. ४ जागांसाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पिळकोस ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील नऊ जागांपैकी एक जागा बिनविरोध झाली. सोनाली राजेंद्र जाधव या बिनविरोध झाल्या असून, चार इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदविल्याने आठ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. देसराणे ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील नऊ जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या. त्यात हिरामण बहिरम, सिंधूबाई बहिरम व शिवदासानी पवार बिनविरोध निवडून आले असून, दोघांनी माघार नोंदविल्याने सहा जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मानूर ग्रामपंचायतीमध्ये पाच प्रभागांतील १३ जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या. त्यात गोपाळ पिठे, योगेश चव्हाण, वंदना पिठे, अनिल गांगुर्डे, गजेंद्र पवार, रंजना कुवर हे बिनविरोध निवडून आले असून, १३ इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदविल्याने पाच जागांसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात असून, दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. भादवण ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील नऊ जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात रमेश पवार, पुष्कराज पाटील, रेश्माबाई पवार, प्रवीण जाधव, गुंजाबाई पवार व ललिता नीलेश जाधव हे बिनविरोध निवडून आले असून, १० उमेदवारांनी माघार नोंदविल्याने तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पाळे खुर्द ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील नऊ जागांसाठी १९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून, सहा इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदवली आहे.वाडी बु. ग्रामपंचायतमध्ये चार प्रभागांतील ११ जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात दत्तू बागुल, सुमनताई वाघ, प्रभाकर पवार, मनीषा सोनवणे, भारती बोरसे व कमल मोरे हे बिनविरोध निवडून आले असून, नऊ इच्छुक उमेदवारांनी माघार नोंदविल्याने पाच जागांसाठी १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बगडू ग्रामपंचायतीमध्ये तीन प्रभागांतील सात जागांपैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात दोधा पवार, साळूबाई सोनवणे, निंबा वाघ बिनविरोध निवडून आले असून, दोन उमेदवारांनी माघार नोंदविल्याने चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गोळाखाल ग्रामपंचायतीमध्ये चार प्रभागांतील ११ जागांपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात बापू बहिरम, उज्ज्वला बहिरम, अनुसया पवार, मनीराम पवार, प्रकाश अहेर, कुसुम अहेर, भगवान महाले व जनाबाई पवार हे बिनविरोध निवडून आले असून, पाच उमेदवारांनी माघार नोंदविल्याने तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
चार गावांमधील सरपंच बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:32 PM