पंचवटी : देवदेवतांची मंदिरे उघडण्याचा निर्णय शासनाने त्वरित न घेतल्याने येत्या २८ आॅगस्ट रोजी गंगाघाट कपालेश्वर मंदिर पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा विविध धार्मिक संघटना तसेच मंदिरांच्या पुजाऱ्यांनी दिला आहे.पुरोहित संघाच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात सर्व अर्थव्यवस्था सुरळीत झाली मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली नसल्याने भाविकांना देवदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे.बैठकीला रामसिंग बावरी, विनोद थोरात, धनंजय पुजारी, अविनाश गाडे, आदिंसह विविध मंदिर पुजारी तसेच हिंदू एकता, कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर पुजारी उपस्थित होते.
मंदिरे सुरू करण्यासाठी २८ रोजी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:58 AM