नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील भाम प्रकल्पबाधित गाव म्हणून समजल्या जाणार्या भरवज-निरपण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सीताबाई गणपत घारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कृष्णा घारे यांनी आवर्तन पद्धतीने सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार भरवज,निरपन ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी शाम बोरसे होते. या ग्रामपंचायतीत एकूण सदस्य संख्या नऊ असून यापैकी चार सदस्य गैरहजर राहिले व पाच सदस्यांनी उपस्थित राहून सरपंच निवड प्रक्रि येत सहभाग नोंदवला. सरपंच पदासाठी सौ सीताबाई घारे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच केशव मानकर सदस्य कृष्णा घारे, यशोदा नाडेकर, चांगुणाबाई घारे, हे सदस्य उपस्थित होते. या निवडणूक कामी तलाठी विजय खादे,रामदास जागले, समाजकल्याण विभागाचे कर्मचारी अशोक कर्डक ग्रामसेवक साळवे ,यांनी काम पाहिले. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी सरपंच गणपतराव घारे, कृष्णा घारे,ओमानंद घारे, सदाशिव साळवे,गणपत घारे, पोलीस पाटील अर्चना घारे, कैलास घारे, विष्णू घारे, किसन घारे, पांडुरंग घारे, एकनाथ घारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
भरवज-निरपण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सिताबाई घारे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 2:48 PM