नांदूरवैद्य : आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या वेतन, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, वाढीव वीजबिले, मोफत धान्य वाटप, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे आदी प्रश्न जैसे थेच असल्यामुळे सिटूतर्फे गोंदे फाटा येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आले.आदिवासी तालुका म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात गरिबांना स्वस्त धान्य दुकानांतून धान्य वितरित केले जाते; परंतु अजून अनेक नागरिकांना याचा लाभ मिळालेला नाही.त्याचप्रमाणे आयकर लागू नसलेल्या नागरिकांना दरमहा दहा हजार रुपयेप्रमाणे सहा महिने आर्थिक साहाय्य करावे व माणसी दहा किलो दरमहा धान्य मोफत देण्यात यावे, केंद्र सरकार व राज्य सरकारने कामगार कायदे रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा आदी मागण्यांसाठी सिटू संघटनेचे जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे तसेच इतर कामगार, आदिवासी बांधवआदींनी जोरदार घोषणा देत निदर्शने केली.
गोंदे येथे सिटूची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 10:07 PM
नांदूरवैद्य : आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या वेतन, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, वाढीव वीजबिले, मोफत धान्य वाटप, कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना कामावर घेणे आदी प्रश्न जैसे थेच असल्यामुळे सिटूतर्फे गोंदे फाटा येथे घोषणा देऊन निदर्शने करण्यात आले.
ठळक मुद्देनिवेदन : दरमहा दहा किलो धान्याची मागणी