शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

सहा कोटींचा अपहार; २४ संशयितांवर गुन्हा

By admin | Published: January 05, 2017 2:17 AM

श्री गणेश बॅँक : अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश, गैरव्यवहार उघड

नाशिक : श्री गणेश सहकारी बॅँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापसात संगनमत करून बनावट कर्जप्रकरणे दाखल करून घेत बॅँक व ठेवीदारांचा विश्वासघात करत सुमारे ६ कोटी ७ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार लेखापरीक्षणात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकूण २४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकस्तंभावरील श्री गणेश नागरी सहकारी बॅँकेतील २४ कर्मचाऱ्यांनी आपापसात संगनमत करत सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याची बाब सनदी लेखापाल अजय नंदलाल राठी यांच्या निदर्शनास आली.राठी यांनी याबाबत संबंधितांच्या नावांसह सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी एकूण २४ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दाखल झालेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पडताळणी सुरू केली असून, या प्रकाराचा तपास वेगाने सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी दिली आहे.श्री गणेश सहकारी बॅँकेमध्ये २०१२ ते २०१४ सालापर्यंत कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी, लिपिक, शाखा व्यवस्थापक यांनी संगनमताने बॅँकेचा व ठेवीदारांचा विश्वासघात करून बॅँकेत बनावट कर्जप्रकरणे दाखल करून घेत एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. राठी यांनी बॅँकेचे संपूर्ण लेखापरीक्षण केले असता सदरचा गैरव्यवहार त्यांच्या निदर्शनास आला. संशयितांनी अशोकस्तंभ येथील बॅँकेच्या मुख्य शाखेत सहा कोटी सात लाख रुपयांचा अपहार करून पिंपळगाव बसवंत येथील शाखेतही अशाच प्रकारे अपहार केला आहे. दोन्ही शाखांचा मिळून ६ कोटी ७ लाख १५ हजार रुपयांचा अपहार केला आहे. (प्रतिनिधी)