शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

खासगी बसचे सहाशे तर टॅक्सीचे आठशे रुपये भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:03 AM

दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मुंबईला रेल्वे मार्गाने जाऊ न शकणाºया हजारो प्रवाशांनी खासगी बस आणि टॅक्सींचा आधार घेतला. परंतु खासगी बसचालकांनी नियमित भाडे वाढवून चक्क पाचशे ते सहाशे आणि टॅक्सीचालकांनी तब्बल आठशे ते नऊशे रुपयांचे भाडे वसूल करीत प्रवाशांची अक्षरश: लूट केली. रात्री कल्याण येथे खासगी बस अडविल्यानंतर बस पाठविणे बंद करण्यात आले आहे.

नाशिक : दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे मुंबईला रेल्वे मार्गाने जाऊ न शकणाºया हजारो प्रवाशांनी खासगी बस आणि टॅक्सींचा आधार घेतला. परंतु खासगी बसचालकांनी नियमित भाडे वाढवून चक्क पाचशे ते सहाशे आणि टॅक्सीचालकांनी तब्बल आठशे ते नऊशे रुपयांचे भाडे वसूल करीत प्रवाशांची अक्षरश: लूट केली. रात्री कल्याण येथे खासगी बस अडविल्यानंतर बस पाठविणे बंद करण्यात आले आहे. दुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे पंचवटीसह अन्य सर्व रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना पुन्हा नाशिकरोडहून नाशिक शहर गाठावे लागले. त्यामुळे महामार्ग बसस्थानकावर गर्दी झाली होती. राज्य परिवहन मंडळाने ज्यादा बसची सोय केली असली तरी त्याला मर्यादा असल्याने हजारोंच्या संख्येने जमलेल्या प्रवाशांनी खासगी बस वाहतुकीची मदत घेतली. मात्र ही संधी साधून खासगी बस व्यावसायिकांनी दरवाढ करून अक्षरश: लूट केली. बसचे प्रवासीभाडे वाढवून ते पाचशे ते सहाशे रुपये प्रतिप्रवासी असे वसूल केले. प्रवाशांची संख्या बघून दरवाढ होत होती. हाच प्रकार टॅक्सी आणि कुलकॅबच्या बाबतीतही घडला. मुंबई सेवा देणाºया टॅक्सीचालकांनी आठशे ते नऊशे रुपये प्रतिप्रवासी असे दर आकारले. इतके ज्यादा दर मोजूनही प्रवासी मुंबईकडे रवाना होत होते. ज्यांना हे दर शक्य नव्हते त्यांनी मुंबईकडे जाणाºया टेम्पो, ट्रक्सचा देखील आधार घेतला.मुंबईकरांना हॉटेल, ढाब्यांचा सहाराव्यवसाय वा कामानिमित्त कारने मुंबईबाहेर गेलेले व पुन्हा घरी परतणाºया मुंबईकरांची वाहने सायंकाळी सहा वाजेपासूनच महामार्ग पोलिसांनी घोटी टोल नाक्यावर रोखली़रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने व त्यातच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महामार्ग पोलिसांनी हा निर्णय घेतला होता़या कालावधीत प्रवाशांची तसेच वाहनचालकांना राहण्यासाठी महामार्गावरील मंदिरे व चर्चमध्ये व्यवस्था करण्यात आली होती़काहींनी ढाबे तसेच हॉटेल्सचा पर्याय निवडला़सकाळपासून रस्त्याच अडकलेल्या प्रवाशांचे मोबाईलही डिस्चार्ज झाल्याने संपर्कात अडचणी येत होत्या.