सिन्नर : शहरात एक व टेंभूरवाडी (आशापूर) येथे पाच असे सहा रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाला. त्याचबरोबर नाशिक-पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात असलेल्या महामार्ग पोलीस पथकातील ३५ वर्षीय पोलीसही बाधीत आढळून आल्याने चिंता वाढली आहे.सिन्नर शहर कोरोनामुक्त झाले होते. मात्र शहरातील रेणुकानगर भागातील ५९ वर्षीय पुरुष कोरोनाबाधीत आढळून आल्याने सदर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. या रुग्णाच्या संपर्कातील ३ जणांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे.तालुक्यातील टेंभूरवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष चार दिवसांपूर्वी कोरोनाबाधीत आढळून आला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील हायरिस्क सदस्यांना तपासणीसाठी सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यातील सहा जण कोरोना बाधीत आढळून आले होते. आज दुपारी पुन्हा त्यातील पाच जण बाधीत आढळून आले. त्यात चार महिलांसह १३ वर्षीय मुलाचा समावेश आहे.दरम्यान, सोमवारी दुपारी ११ अहवाल प्राप्त झाले असून त्यातील ५ जण निगेटीव्ह तर ६ जण पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या २५ कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्णसंख्या ५३ झाली असून बाहेरील ६ रुग्ण आढळून आले होते.एकाच कुटुंबातील १२ बाधीतटेंभूरवाडी येथील एकाच कुटुंबातील १२ जण कोरोना बाधीत झाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने टेंभूरवाडी (आशापूर) गावाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. रुग्णसंख्या वाढू नये यासाठी काळजी घेतली जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, डॉ. लहू पाटील यांनी दिली.
सिन्नर शहरासह टेंभूरवाडी येथे सहा बाधीत रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 9:28 PM
सिन्नर : शहरात एक व टेंभूरवाडी (आशापूर) येथे पाच असे सहा रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाला. त्याचबरोबर नाशिक-पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात असलेल्या महामार्ग पोलीस पथकातील ३५ वर्षीय पोलीसही बाधीत आढळून आल्याने चिंता वाढली आहे.
ठळक मुद्देपुन्हा शिरकाव : महामार्ग पोलीसही बाधित; चिंतेत वाढ; आरोग्य विभाग सतर्क