नाशिक : पुणे-नाशिक महामार्गाने कुंभमेळा पर्वणीकाळात शहरात येणाऱ्या भाविकांच्या खासगी वाहनांसाठी शहरापासून ११ किलोमीटर दूर असलेल्या चिंचोली मोहगाव येथे बा' तर सिन्नर फाटा-सामनगावरोडवर अंतर्गत वाहनतळ उभारण्यात आला आहे. नाशिकरोड रेल्वेस्टेशनवर उतरणारे भाविकही याच अंतर्गत वाहनतळावरून स्नानासाठी पुढे जाणार आहेत. दरम्यान, पुणे महामार्गावरून ८ ते १० टक्के भाविक येतील, असा अंदाज पोलीस प्रशासनाने वर्तविला असून, त्यांना ५़७६ किलोमीटर पायपीट करून स्नानासाठी दसक-पंचक घाटावर जावे लागणार आहे. नाशिक शहरापासून चिंचोली-मोहगावचे अंतर ११ किलोमीटर आहे. पुणे-नाशिक महामार्गाने येणाऱ्या भाविकांची खासगी वाहने या बा'वाहनतळावर रोखली जाणार आहेत. या वाहनतळासाठी ३० हेक्टर (७५ एकर) जमीन ताब्यात घेऊन त्यावर भाविकांसाठी विविध सुविधा करण्यात आल्या आहेत. शहर बससेवेद्वारे या भाविकांना सिन्नर फाटा येथील अंतर्गत वाहनतळावर येता येईल़ या परिसरातील सेंट फिलोमिना हायस्कूल, जेलरोड पुलाजवळ, केला हायस्कूल या ठिकाणी सुमारे ४५ हजार नागरिकांसाठी निवारा शेड तयार करण्यात येणार आहेत़ बा'वाहनतळापासून बसने सिन्नर फाटा-सामनगावरोड या अंतर्गत वाहनतळावर आलेल्या भाविकांना रेल्वे उड्डाणपुलाखालून शिवाजी महाराज पुतळा, बिटको पॉइंट, जेलरोड या मार्गाने ५.७६ किलोमीटर पायपीट केल्यानंतर ते दसक घाटावर स्नानासाठी पोहोचतील, तसेच परतीसाठी त्यांना याच मार्गाच्या डाव्या बाजूचा वापर करावा लागेल़ शाहीमिरवणूक व शाहीस्नान संंपल्यानंतर या भाविकांना घाटमार्गानेच रामकुंडावर स्नानासाठी जाता येईल़ तर आपत्कालीन परिस्थितीत या मार्गावरील भाविकांना द्वारका कन्नमवार पूल व कन्नमवार घाटावर वळवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. घाटावर अधिक गर्दी झाल्यास सुमारे ५ ते ७ हजार भाविकांना या रस्त्यावर तात्पुरते थांबविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनामार्फत या मार्गावर ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याचे नियंत्रण नाशिकरोड येथील नियंत्रण कक्षातून केले जाणार आहे़ पुणे महामार्ग विभागासाठी १५ पोलीस चौक्या उभारण्यात येणार असून, यातील ४ कायमस्वरूपी, तर ६ तात्पुरत्या स्वरूपाच्या असणार आहेत़ यातील उर्वरित ५ चौक्या या बा'वाहनतळावर राहुट्यांच्या स्वरूपात असणार आहेत. प्रत्येक पोलीस चौकीत ७ ते ८ कर्मचारी असे २२५ कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याचे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.(प्रतिनिधी) पोलीस प्रशासनाची पुणे महामार्गावरील तयारी * निरीक्षण मनोरे - ३ * पोलीस चौक्या - १५ * सीसीटीव्ही कॅमेरे - ३२ *े बॅरिकेडिंग - ६०० मी. * निवारा शेड - ४ * लाउडस्पिकर - १७८ * मार्गदर्शक फलक - ४०
पुणे महामार्गावरील भाविकांना स्नानासाठी सहा किलोमीटर पायपीट
By admin | Published: May 27, 2015 12:41 AM