संशयित अशोक महाजन, रोहन, प्रिया, प्रतिभा शर्मा आणि सुभाष अशी गंडा घालणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप तितारे (३४ रा. शाहूनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तितारे यांनी एचडीएफसी या बँकेची विमा पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वीच संशयितांनी १६ मे ते १ ऑक्टोबरदरम्यान त्यांच्याशी संपर्क साधून प्रोसेसिंग फी, सेटलमेंट रक्कम, मंजुरीचे शुल्क असे विविध कारणे सांगून ७ लाख ३० हजार रुपयांची विम्याची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी संशयितांनी तितारे यांचा मोबाइल नंबर मिळवून संपर्क साधला होता. एचडीएफसी बँक कर्मचारी असल्याचे भासवून संशयितांनी विविध बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडले. या काळात तितारे यांनी तब्बल ६ लाख १० हजारांची रक्कम भरली. कालांतराने संशयितांचा संपर्क तुटल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सगळा प्रकार कथन केला.
विम्याच्या रकमेचे आमिष दाखवून सहा लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2020 4:15 AM