नांदूरवैद्य : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील स्वस्त धान्य विक्रेता लाभार्थ्यांना शासन दराप्रमाणे व वेळेवर दर पाच ते सहा महिन्यांपासून रेशनचे धान्य उपलब्ध होत नसल्याने काही महिन्यांपुर्वी या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा ठराव सरपंच संतोष जुंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या सह्यानिशी ग्रामपंचायत कार्यालयात पास करण्यात आला होता. तसेच तहसिलदारांना निवेदनाद्वारे परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ग्रामस्थांनी धान्य मिळत नसल्याने नाशिक येथील तहसीलदार अनिल दौडें यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.लोहशिंगवे स्वस्त धान्य विक्रेत्याकडे मागील दहा बारा वर्षापासून स्वस्त धान्य दुकान आहे. परंतु मागील काही दिवसांपासून शासनाच्या दराप्रमाणे एपीएल, बीपीएल व अन्न सुरक्षेतील लाभार्थ्यांना गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे रेशन वितरित केले जात नसल्याची तक्र ार ग्रामस्थांनी सरपंच यांच्याकडे केली आहे.तसेच या दुकानात कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही, त्याचप्रमाणे स्वस्त धान्य दुकानात किती धान्य साठा आला ? व किती वितरित झाला ? या संदर्भात ग्रामस्थांना कोणतीही माहिती दिली जात नाही. यासाठी सरपंच संतोष जुंद्रे यांच्यासह ग्रामस्थांनी नाशिक येथील तहसीलदार अनिल दौडें यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देवून रेशन दुकानात सुरळीत धान्य पुरवठा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.याप्रसंगी निवेदन उपसरपंच रतन पाटोळे, माजी उपसरपंच शिवाजी डांगे, तुकाराम पाटोळे, जगन पाटोळे, प्रभाकर जुंद्रे, ज्ञानेश्वर पाटोळे, रविंद्र चौधरी, नितीन पाटोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पन्नास टक्के नागरिकांना रेशन उपलब्ध होत नसल्याने सदर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याचा ठराव दोन ते तीन महिन्यापुर्वी केला होता. त्यानंतरही नागरिकांना वेळेवर रेशन मिळत नसल्याने तहसीलदार यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.- संतोष जुंद्रे. सरपंच लोहशिंगवे.
सहा महिन्यांपासून नागरिक रेशन धान्यापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 9:01 PM
नांदूरवैद्य : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील स्वस्त धान्य विक्रेता लाभार्थ्यांना शासन दराप्रमाणे व वेळेवर दर पाच ते सहा महिन्यांपासून रेशनचे धान्य उपलब्ध होत नसल्याने काही महिन्यांपुर्वी या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा ठराव सरपंच संतोष जुंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या सह्यानिशी ग्रामपंचायत कार्यालयात पास करण्यात आला होता. तसेच तहसिलदारांना निवेदनाद्वारे परवाना रद्द करण्याची जोरदार मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ग्रामस्थांनी धान्य मिळत नसल्याने नाशिक येथील तहसीलदार अनिल दौडें यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
ठळक मुद्देलोहशिंगवे : स्वस्त धान्य दुकानातून पुरवठा होत नसल्याने तहसीलदारांना निवेदनाद्वारे तक्र ार