शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सहा महिन्यांत स्वतंत्र सहकारी गृहनिर्माण कायदा येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:50 PM

राज्यात सुमारे अडीच लाख सहकारी संस्था असून, यात जवळपास एक लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. परंतु, महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या १९६० चा सहकार कायदा अन्य सहकारी संस्थांच्या तुलनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अडचणीचा आणि क्लिष्ट ठरत असल्याने राज्यात केवळ गृहनिर्माण संस्थांसाठी येत्या सहा महिन्यांत स्वतंत्र कायदा अस्तित्वात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी नाशिक येथे दिली.

नाशिक : राज्यात सुमारे अडीच लाख सहकारी संस्था असून, यात जवळपास एक लाख सहकारी गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. परंतु, महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या १९६० चा सहकार कायदा अन्य सहकारी संस्थांच्या तुलनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अडचणीचा आणि क्लिष्ट ठरत असल्याने राज्यात केवळ गृहनिर्माण संस्थांसाठी येत्या सहा महिन्यांत स्वतंत्र कायदा अस्तित्वात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी नाशिक येथे दिली.  नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात रविवारी (दि. २१) सहकारी गृहनिर्माण/हौसिंग संस्थ्यांच्या सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर निवृत्त विभागीय उपनिबंधक ए. एम. मोरे, सूर्यभान पाटील, राजू देसले, प्रिया दळणार आदी उपस्थित होते. यावेळी रेराच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरणही निर्माण केले जात असून, त्यासाठी १० सदस्यीय समितीची स्थापनाही करण्यात आल्याचे रमेश प्रभू यांनी सांगितले.  रमेश प्रभू म्हणाले, प्राधिकरणकडे येणाºया सोसायटीच्या तक्र ारीबाबत ६० दिवसांच्या आत निर्णय देणे आवश्यकच असणार असून, कायद्यानुसार सोसायट्यांचे आॅडिट करणे, निवडणूक घेणे आदी बाबी या बंधनकारक असणार आहे. २०० पेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायट्यांच्या निवडणुका संस्था स्तरांवरच घेता येणार असल्याचे स्पष्ट करतानाच २०० पेक्षा अधिक सभासद असलेल्या सोसायट्यांना मात्र प्राधिकरणाच्या नियंत्रणातच निवडणुका घेणे बंधनकारक होणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले. दरम्यान, विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाºयांनी विचारलेल्या शंकांचे रमेश प्रभू यांनी निरसन केले. नाशिकच्या पदाधिकाºयांची घोषणा रमेश प्रभू यांनी मेळाव्यात महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनच्या नाशिक शाखेचे मेळाव्याच्या निमित्ताने उद्घाटन झाल्याचे जाहीर करतानाच या शाखेच्या अध्यक्षपदी अरविंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली, तर सचिवपदी प्रकाश गायकर व खजिनदार म्हणून अशरफ अली यांची नेमणूक करण्यात आली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांबाबतच्या समस्या व अडचणींबाबत व त्या सोडविण्यासाठी ही समिती मोफत मार्गदर्शन करणार असल्याचे प्रभू यांनी जाहीर केले.

टॅग्स :HomeघरNashikनाशिक